vladimir putin

रशियाने (Russia) युक्रेनवर राष्ट्रपती पुतिन यांची हत्या करण्याच्या उद्देशाने क्रेमलिनवर ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.

    मॉस्को: रशियाने बुधवारी सांगितलं की, युक्रेनचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला. रशियाने (Russia) युक्रेनवर राष्ट्रपती पुतिन यांची हत्या करण्याच्या उद्देशाने क्रेमलिनवर ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. मॉस्कोच्या नागरिकांनी स्थानिक वेळेनुसार दुपारी दोन वाजता क्रेमलिनच्या भिंतीच्या मागे स्फोटांचे आवाज ऐकले. त्यानंतर क्रेमलिनवर आकाशात धूर पसरलेला दिसला. काहींनी याचं व्हिडिओ फुटेजही शेअर केलं आहे. मात्र या हल्ल्यामागे युक्रेनचं आहे,अशी अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.(Drone Attack On Vladimir Putin)

    रशिया घेणार बदला
    रशियन न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, क्रेमलिनने धमकी दिली आहे की रशियाला केव्हाही आणि कुठेही या हल्ल्याचं प्रत्युत्तर देण्याचा आणि बदला घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. क्रेमलिनवर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाल्यानंतर रशिया-युक्रेन युद्ध आणखी पेटू शकतं,असा अंदाज आहे. पुतिन या हल्ल्याचं उत्तर देऊ शकतात. बदला घेण्यासाठी ते युक्रेनवर हल्ला करू शकतात. क्रेमलिनने या घटनेला सुनियोजित दहशतवादी हल्ला आणि रशियाच्या राष्ट्रपतींना जीवे मारण्याचा कट म्हटलं आहे. रशियन अधिकाऱ्यांच्या मते, युक्रेनने दोन ड्रोनच्या माध्यमातून क्रेमलिनवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही ड्रोन पाडण्यात यश आलं आहे. या हल्ल्यात कुणीही जखमी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. क्रेमलिनमधील या ड्रोन हल्ल्यानंतर मॉस्कोमध्ये ड्रोन उडवण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

    हल्ल्याच्या वेळी क्रेमलिनमध्ये नव्हते पुतिन
    रशियन राष्ट्रपती कार्यालय क्रेमलिनचे प्रवक्ता दिमित्री पेसकोव यांनी सांगितलं की, ड्रोन हल्ल्याच्या वेळी राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन क्रेमलिनमध्ये नव्हते. मात्र पुतिन नक्की कुठे होते हे मात्र पेसकोव यांनी सांगितलं नाही. या हल्ल्याचा पुतिन यांच्या कामकाजावर कोणताही परिणाम झाला नसल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यांचं सगळं काम सुरळीत सुरु असल्याचंही ते म्हणाले. या ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न व्हिक्टरी डे च्या पूर्वसंध्येला करण्यात आला. आता या सगळ्या घडामोडींनंतर युक्रेनकडून हल्ल्याबाबत काय स्पष्टीकरण येतंय याची प्रतीक्षा आहे.