unemployment

'डॉन' या पाकिस्तानातील प्रमुख वर्तमानपत्राच्या एक बातमीत पाकिस्तानात न्यायालयातील शिपायाच्या एका जागेसाठी १५ लाख उमेदवारांनी अर्ज केल्याचे म्हटले आहे. या चतुर्थ श्रेणी पदासाठी अर्ज करणाऱयांत चक्क एम.फिल. पदवी मिळवलेले अनेक युवकही असल्याचेही बातमीत स्पष्ट करण्यात आले आहे.

    बेरोजगारीने कळस गाठला असून शिपायाच्या एका जागेसाठी १५ लाख उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. ही अवस्था आहे दहशतवाद आणि कर्जाच्या ओझ्याखाली पार दबलेल्या पाकिस्तानची! येथे दिवसेंदिवस तरुणांच्या बेरोजगारीमुळे अडचणी वाढतच चालल्या आहेत.

    पाकिस्तान इन्स्टिटय़ूट ऑफ डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स (पीडे) ने देशातील बेरोजगारी दर १६ टक्क्यांहून जास्त असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानात २४ टक्के सुशिक्षित युवक बेरोजगार असल्याचे पीडेने अहवालात म्हटले आहे. या अहवालाने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या चिंतेत भर पडली आहे. इम्रान देशात बेरोजगारीचा दर ६.५ टक्के असल्याचे खोटे सांगत फिरत आहेत. नव्या अहवालाने पाकिस्तान बेरोजगारीच्या खाईत पडल्याचे उघड केले आहे.

    ‘डॉन’ या पाकिस्तानातील प्रमुख वर्तमानपत्राच्या एक बातमीत पाकिस्तानात न्यायालयातील शिपायाच्या एका जागेसाठी १५ लाख उमेदवारांनी अर्ज केल्याचे म्हटले आहे. या चतुर्थ श्रेणी पदासाठी अर्ज करणाऱयांत चक्क एम.फिल. पदवी मिळवलेले अनेक युवकही असल्याचेही बातमीत स्पष्ट करण्यात आले आहे.