सीरियात अमेरिकेचा एअर-स्ट्राईक, अलकायदाचा टॉप नेता अब्दुल हालिद अल-मातरला मारले

सीरियातून जगभरातील दहशतवादी हल्ल्यांची रणनीती अल कायदा तयार करते आहे. दहशतवादाविरुद्धचे हे युद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. अल कायदाच्या प्रमुखाला मारल्यामुळे आता काही काळ तरी त्यांची ऑपरेशन्स थांबतील, असा विश्वासही रिग्सबी यांनी व्यक्त केला आहे.

    सीरिया : अमेरिकन सैन्याने (American Army) सीरियात (Syria) एअरस्ट्राईक (Airstrike) केला असून, यात अल कायदा (Al-Qaeda) या दशतवादी संघटनेचा प्रमुख नेता अब्दुल हामीद अल मातर Abdul Halid al Matar) याचा खात्मा करण्यात आला आहे.

    शुक्रवारी अमेरिकी सेंट्रल कमांडचे प्रवक्ते मेजर डॉन रिग्सबी (U.S. Central Command spokesman Major Don Rigsby) यांनी याबाबतची माहिती दिली. अल कायदा ही संघटना अजूनही अमेरिका आणि त्याच्या सहकारी देशांसाठी धोकादायक संघटना आहे. अल कायदासाठी सीरिया ही सुरक्षित जागा असून, सीरियातून जगभरातील दहशतवादी हल्ल्यांची रणनीती अल कायदा तयार करते आहे. दहशतवादाविरुद्धचे हे युद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. अल कायदाच्या प्रमुखाला मारल्यामुळे आता काही काळ तरी त्यांची ऑपरेशन्स थांबतील, असा विश्वासही रिग्सबी यांनी व्यक्त केला आहे.