तैवानवरून अमेरिका-चीनमध्ये तणाव; चीनने तैवानला चारही बाजूंनी घेरले

पेलोसी म्हणाल्या- सुरक्षेच्या मुद्द्यावर अमेरिका तैवानला पाठिंबा देईल. आम्ही प्रत्येक क्षणी त्यांच्यासोबत आहोत. तैवानच्या मैत्रीचा आम्हाला अभिमान आहे. तैवानच्या पाठीशी उभे राहण्याचे 43 वर्षांपूर्वी अमेरिकेने दिलेले वचन आजही ते पूर्ण करत असल्याचे त्या म्हणाल्या.

    नवी दिल्ली – अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी लवकरच तैवानहून रवाना होणार आहेत. येथून त्या दक्षिण कोरियाला जाणार आहेत. तत्पूर्वी, त्यांनी तैवानच्या संसदेला संबोधित केले. यादरम्यान त्यांनी राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन यांचीही भेट घेतली. दुसरीकडे, चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (PLA) गुरुवार ते रविवार या कालावधीत तैवानच्या आसपासच्या ६ भागांत लष्करी सराव करण्याचे सांगितले आहे. प्रत्यक्षात चीनने तैवानला चारही बाजूंनी घेरले आहे.

    पेलोसी म्हणाल्या- सुरक्षेच्या मुद्द्यावर अमेरिका तैवानला पाठिंबा देईल. आम्ही प्रत्येक क्षणी त्यांच्यासोबत आहोत. तैवानच्या मैत्रीचा आम्हाला अभिमान आहे. तैवानच्या पाठीशी उभे राहण्याचे 43 वर्षांपूर्वी अमेरिकेने दिलेले वचन आजही ते पूर्ण करत असल्याचे त्या म्हणाल्या.

    पेलोसी यांना ऑर्डर ऑफ प्रोपियस क्लाउड्स विथ स्पेशल ग्रँड कॉर्डन, तैवानचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. पेलोसी म्हणाल्या, अमेरिका तैवानची बाजू सोडणार नाही. आमच्या काँग्रेसच्या शिष्टमंडळाची तैवानला भेट या देशाच्या चैतन्यशील लोकशाहीला पाठिंबा देण्याच्या अमेरिकेच्या वचनबद्धतेचा सन्मान करते.