अमेरिका-रशिया युद्धाची शक्यता, युक्रेनच्या सीमेवर १.७५ लाख रशियन सैन्य तैनात, रशियाने हल्ला केल्यास अमेरिका सैन्य पाठवणार, बायडेन यांचा इशारा

युक्रेनच्या सीमेवर रशियन सैन्याच्या उपस्थितीने युरोपातील राजकीय वातावरणही तापले आहे. ऑक्टोबरमध्ये पोलंड आणि बेलारुस यांच्यातील प्रवाशांच्या निमित्ताने सीमावाद प्रकट झाला. त्या वादाचा फायदा घेत रशियाने इथे शिरकाव केला आहे. बेलारुसला प्रत्यक्ष मदत देण्याच्या बहाण्याने, रशियाने आपले सैन्य त्या परिसरात तैनात केले. मंगळवारी रात्री उशिरा युक्रेन आणि रशियन सैन्याचा पाठिंबा असणाऱ्या फुटीरतावाद्यांमध्ये चकमकी झाल्याची माहिती आहे. युक्रेन संकटाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यात व्हर्च्युअल मिटींग पार पडली. युक्रेनच्या सार्वभौमत्वाला पाठिंबा असल्याचे यावेळी अमेरिकेने रशियाला सांगितले. तर युक्रेन अमेरिका आणि इतर देशांच्या मदतीने रशियाच्या सुरक्षेसमोर आव्हाने निर्माण करत असल्याचे पुतिन यांनी सांगितले आहे.

    वॉशिंग्टन – रशियाने युक्रेनच्या सीमेवर, हल्ल्याच्या तयारीत पावणे दोन लाखांचे सैन्य् सज्ज ठेवले आहे. या सैन्यासोबोत अत्याधुनिक शस्त्रास्त्रेही सज्ज आहेत. कोणत्याही क्षणी रशिया युक्रेनवर हल्ला करु शकेल, अशी माहिती अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने दिली आहे. अशी परिस्थिती उद्भवली तर पूर्व युरोपात असलेल्या युक्रेनच्या संरक्षणासाठी, सैन्य पाठवणार असल्याची घोषणा अमेरिकेने केली आहे. शीतयुद्धाच्या ३० वर्षांवनंतर पहिल्यांदा अमेरिका प्रत्यक्ष स्वरुपात पूर्व युरोपमध्ये सैन्य पाठवण्याची शक्यता आहे.

    युक्रेनच्या सीमेवर रशियन सैन्याच्या उपस्थितीने युरोपातील राजकीय वातावरणही तापले आहे. ऑक्टोबरमध्ये पोलंड आणि बेलारुस यांच्यातील प्रवाशांच्या निमित्ताने सीमावाद प्रकट झाला. त्या वादाचा फायदा घेत रशियाने इथे शिरकाव केला आहे. बेलारुसला प्रत्यक्ष मदत देण्याच्या बहाण्याने, रशियाने आपले सैन्य त्या परिसरात तैनात केले. मंगळवारी रात्री उशिरा युक्रेन आणि रशियन सैन्याचा पाठिंबा असणाऱ्या फुटीरतावाद्यांमध्ये चकमकी झाल्याची माहिती आहे.

    पुतीन आणि बायडेन यांची व्हर्च्युअल मिटींग

    युक्रेन संकटाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यात व्हर्च्युअल मिटींग पार पडली. युक्रेनच्या सार्वभौमत्वाला पाठिंबा असल्याचे यावेळी अमेरिकेने रशियाला सांगितले. तर युक्रेन अमेरिका आणि इतर देशांच्या मदतीने रशियाच्या सुरक्षेसमोर आव्हाने निर्माण करत असल्याचे पुतिन यांनी सांगितले आहे.