file phot-social media
file phot-social media

हा हल्ला सोमालियाची राजधानी मोगादिशूपासून 260 किमी ईशान्येकडे असलेल्या गलकाडजवळ झाला. या हल्ल्यात कुणीही नागरिक जखमी किंवा ठार झाले नाहीत

  सोमालिया : मध्य सोमालीयातील (Somalia) गलकाड या शहरजवळ अमेरिकेच्या लष्कराने केलेल्या हल्ल्यात सुमारे 30 इस्लामी अल-शबाब दहशतवादी ठार झाले आहेत. अमेरिकेचे लष्कर आणि अल-शबाब दहशतवाद्यांमध्ये जोरदार युद्ध झाले. हा हल्ला सोमालियाची राजधानी मोगादिशूपासून 260 किमी ईशान्येकडे असलेल्या गलकाडजवळ झाला. या हल्ल्यात कुणीही नागरिक जखमी किंवा ठार झाले नाहीत.

  दहशतवादी गटाचा प्रतिकार करण्यासाठी अमेरिकेची मान्यता

  मे 2022 मध्ये, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी दहशतवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी या भागात अमेरिकन सैन्य पुन्हा तैनात करण्याच्या पेंटागॉनच्या विनंतीला मान्यता दिली. तेव्हापासून अमेरिकन सैन्य सोमाली सरकारला पाठिंबा देत आहे. दुसरीकडे, माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2020 मध्ये देशातून सर्व अमेरिकन सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतला होता.

  यूएस कमांड फोर्स देणार प्रशिक्षण आणि सल्ला

  अमेरिकन सैन्याने शनिवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सोमालिया पूर्व आफ्रिकेतील स्थिरता आणि सुरक्षिततेचे केंद्र आहे. यूएस आफ्रिका कमांडचे सैन्य अल-शबाब आणि सर्वात घातक अल-कायदाचा पराभव करण्यासाठी सहयोगी सैन्याला आवश्यक असलेले प्रशिक्षण, उपकरणे आणि सल्ला प्रदान करणे सुरू ठेवतील.

  अल-शबाबच्या सैनिकांविरुद्ध युद्ध सुरू

  सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकन सैन्याने अलीकडच्या काही महिन्यांत या भागात अनेक हल्ले केले आहेत. ऑक्टोबर 2022 मध्ये अमेरिकेच्या हल्ल्यात, मोगादिशूच्या वायव्येस 218 किमी अंतरावर अल-शबाबचे दोन दहशतवादी ठार झाले. नोव्हेंबरमध्ये मोगादिशूच्या ईशान्येस सुमारे 285 किलोमीटर अंतरावर अल-शबाबचे 17 सैनिक ठार झाले, तर डिसेंबरमध्ये अमेरिकेच्या दुसर्‍या हल्ल्यात राजधानीच्या ईशान्येस सुमारे 150 मैलांवर असलेल्या कदेल शहराजवळ अल-शबाबचे सहा दहशतवादी ठार झाले.