US Christmas Parade : परेडमध्ये सहभागी झालेल्या लोकांना भरधाव वेगात असलेल्या SUV ने चिरडले; २० हून अधिक जखमी, काही लोक मरण पावले

वुकेशाचे पोलिस प्रमुख डॅनियल थॉम्पसन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, एसयुव्ही जप्त करण्यात आली आहे, मात्र तिचा चालक फरार आहे. संशयिताचा शोध सुरू आहे. घटनास्थळी परिस्थिती आता सामान्य असल्याचे त्यांनी सांगितले. ही घटना कोणत्या उद्देशाने घडली हे अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

  अमेरिका : अमेरिकेत (America), विस्कॉन्सिनमधील (Wisconsin) वुकेशा शहरात (Waukesha City) रविवारी ख्रिसमसच्या परेडमध्ये (US Christmas Parade) सहभागी होणाऱ्या लोकांमधून एक SUV गेली. या अपघातात काही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. याशिवाय २० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे, जे त्यांच्या कुटुंबियांसमवेत परेडमध्ये सहभागी होण्यासाठी आले होते. जखमींना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यात काहींना गंभीर दुखापत झाली आहे.

  वुकेशाचे पोलिस प्रमुख डॅनियल थॉम्पसन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, एसयुव्ही जप्त करण्यात आली आहे, मात्र तिचा चालक फरार आहे. संशयिताचा शोध सुरू आहे. घटनास्थळी परिस्थिती आता सामान्य असल्याचे त्यांनी सांगितले. ही घटना कोणत्या उद्देशाने घडली हे अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

  घटनास्थळी उडाला गोंधळ

  शहराचे महापौर सीन रेली यांनी ही वुकेशासाठी अत्यंत क्लेशदायक घटना असल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्कॉट ग्रेगर नावाच्या व्यक्तीने मीडियाशी संवाद साधत आपल्या डोळ्यांदेखत घडलेली घटना शेअर केली. ते म्हणाले की, एसयुव्हीने परेडच्या मध्यभागी प्रचंड वेगाने प्रवेश केला. गाडीची धडक बसल्यानंतर लोक इकडे तिकडे पडू लागले. अचानक काय होत आहे हे लोकांना समजत नव्हते. घटनास्थळी गोंधळ उडाला.

  परेडमध्ये मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते

  ग्रेगर म्हणाले की, घटनेच्या वेळी परेडमध्ये मोठ्या संख्येने लोक सामील होते. प्रेक्षकांची संख्याही जास्त होती. परिस्थिती पूर्वपदावर यायला बराच वेळ लागला. ५८ वी वार्षिक ख्रिसमस परेड दुपारी २ वाजता सुरू झाली, जी संध्याकाळी संपणार होती. गेल्या वर्षी कोरोना विषाणूच्या साथीमुळे परेड काढण्यात आली नव्हती.