धक्कादायक ! महिलेने 3 वर्षाच्या मुलीला रेल्वेरुळावर ढकलले, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

तीन वर्षांच्या मुलीसह एक आई पोर्टलँडमधील गेटवे ट्रान्झिट सेंटरच्या प्लॅटफॉर्मवर उभी होती. आपल्या ट्रेनची प्रतीक्षा करित त्या दोघी मायलेकी पलाटवर उभ्या होत्या. तेवढ्यात अचानक मागच्या बाकावर बसलेली एक महिला उठते आणि त्या 3 वर्षांच्या मुलीला रेल्वेरुळाकडे ढकलून देते. त्यानंतर ती मुलगी रुळावर जाऊन जोरात पडते. घटनेनंतर लगेचच मुलीला वाचवण्यासाठी आणि मदतीसाठी आजूबाजूचे लोक धावून जातात.

    नवी दिल्ली – अमेरिकेतील पोर्टलँड शहरातील एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात एक महिला 3 वर्षीय मुलीला रेल्वेरुळावर ढकलून देते. ही घटना 28 डिसेंबरची असल्याचे सांगितले जात आहे. सदर आरोपी महिलेवर पोलिसांनी 29 डिसेंबरला कारवाई करून अटक करण्यात आली.

    तीन वर्षांच्या मुलीसह एक आई पोर्टलँडमधील गेटवे ट्रान्झिट सेंटरच्या प्लॅटफॉर्मवर उभी होती. आपल्या ट्रेनची प्रतीक्षा करित त्या दोघी मायलेकी पलाटवर उभ्या होत्या. तेवढ्यात अचानक मागच्या बाकावर बसलेली एक महिला उठते आणि त्या 3 वर्षांच्या मुलीला रेल्वेरुळाकडे ढकलून देते. त्यानंतर ती मुलगी रुळावर जाऊन जोरात पडते. घटनेनंतर लगेचच मुलीला वाचवण्यासाठी आणि मदतीसाठी आजूबाजूचे लोक धावून जातात.

    घटनेच्या वेळी उपस्थित लोकांनी सांगितले की, मुलीला ढकलले गेले त्यावेळी कोणतीही ट्रेन येत नव्हती. एका अधिकाऱ्याने सांगितले – मुलीच्या पोटात आणि डोक्याला जखमा झाल्या आहेत. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, तेथे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांची प्रकृती सामान्य असल्याचे घोषित केले. डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे मुलीला अधूनमधून डोके दुखत असे, मात्र ती लवकरच बरी होईल, असे त्यांनी सांगितले.

    एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, 28 डिसेंबरला आम्हाला माहिती मिळाली की, एका महिलेने 3 वर्षांच्या मुलीला रेल्वे ट्रॅकवर ढकलले. आम्ही लगेच प्लॅटफॉर्मवर पोहोचलो आणि सीसीटीव्ही कॅमेरा तपासला. फुटेजच्या आधारे 32 वर्षीय ब्रायना वर्कमन हीला 29 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली आहे. सद्या ती पोलिसांच्या ताब्यात आहे. मात्र, तिने मुलीला ढकलण्याचे कारण अद्याप सागितले नाही. त्यांची चौकशी सुरू आहे.