
इलॅान मस्कच्या (Elon Musk) टेस्लाचे मुख्य आर्थिक अधिकारी वैभव तनेजा (Vaibhav Taneja) यांनी दिल्लीत शिक्षण घेतले.
इलॅान मस्क (Elon Musk) यांच्या आघाडीच्या टेस्लाने कंपनीने (Tesla) नुकतीचं त्यांच्या नव्या मुख्य आर्थिक अधिकाऱ्याची (CFO) घोषणा केली आहे. पुर्वीचे सीएफओ झॅचरी किर्खॉर्नची यांनी भारतीय वंशाचे लेखा प्रमुख वैभव तनेजा यांच्या नावाची घोषणा केली आहे. 45 वर्षीय वैभवला त्याच्या सीएफओच्या नोकरीव्यतिरिक्त “मास्टर ऑफ कॉईन” ही पदवी देखील मिळाली आहे. तेव्हापासून वैभव चर्चेत आहे. जाणून घ्या भारतीय वंशाचे वैभव तनेजा कोण आहेत.
व्यावसायिक जगातील सर्वोच्च कंपन्यांमध्ये नाव असलेल्या टेस्ला कंपनीने भारतीय वंशाच्या एका नागरिकाची CFO म्हणून नियुक्ती केली आहे. 45 वर्षीय वैभव तनेजा यांची सोमवारी एलोन मस्क यांच्या नेतृत्वाखालील टेस्लाचे नवीन मुख्य आर्थिक अधिकारी (CFO) म्हणून नियुक्ती करण्यात आली.
ऑटोमोटिव्ह आणि क्लीन एनर्जी कंपनी टेस्लाचे पूर्वीचे सीएफओ जॅचरी किरखॉर्न यांनी जाहीर केले की ते पायउतार होत आहेत. मूळचे भारतातील वैभव तनेजा हे टेस्लामध्ये मुख्य लेखा अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय आता ते सीएफओ पदही सांभाळतील.
कोण आहे वैभव तनेजा?
वैभव तनेजा, सध्या टेस्लाचे मुख्य लेखा अधिकारी, आहेत. वैभव तनेजा हे मार्च 2019 पासून टेस्ला येथे मुख्य प्रशासकीय अधिकारी (CAO) आणि मे 2018 पासून कॉर्पोरेट कंट्रोलर म्हणून काम करत आहेत. फेब्रुवारी 2017 ते मे 2018 दरम्यान त्यांनी टेस्ला येथे सहाय्यक कॉर्पोरेट नियंत्रक म्हणूनही काम केले. मार्च 2016 पासून, त्यांनी सोलरसिटीमध्ये विविध वित्त आणि लेखा भूमिकांमध्ये काम केले आहे.