Vanilla ice cream will be made from plastic waste

वैज्ञानिकांनी प्लास्टिकच्या कचऱ्याला वॅनीला फ्लेवरमध्ये परिवर्तीत करण्याचा शोध लावला असल्याचे समोर आले आहे. प्लास्टिकच्या कचऱ्याला वॅनीला फ्लेवरमध्ये परिवर्तन करण्यासाठी जेनेटिकल इंजीनीयर्ड बॅक्टेरियाची मदत घेणार आहे. एका नव्या आभ्यासानुसार ही माहिती समोर आली आहे. वॅनीलिन नावाचे एक कंपाउंड असते ते वॅनीलाप्रमाणे दरवळते तसेच स्वाद उत्पन्न करते.

    दिल्ली : आइस्क्रीम हा सर्व खाद्यपदार्थांपैकी लोकांचा जास्त आवडीचा पदार्थ आहे असे बोलले तरी वावगे ठरणार नाही. अनेक लोकांच्या घरी हमखास रात्री आइस्क्रीमचा बेत असतो. आइस्क्रीमचे वेगवेगळे फ्लेवर मार्केटमध्ये सर्रास उपलब्ध होतात. पण मिळालेल्या माहितीनुसार भविष्यात वॅनीला आइस्क्रीम ही प्लास्टिकच्या कचऱ्यापासून तयार केली जाऊ शकते.

    वैज्ञानिकांनी प्लास्टिकच्या कचऱ्याला वॅनीला फ्लेवरमध्ये परिवर्तीत करण्याचा शोध लावला असल्याचे समोर आले आहे. प्लास्टिकच्या कचऱ्याला वॅनीला फ्लेवरमध्ये परिवर्तन करण्यासाठी जेनेटिकल इंजीनीयर्ड बॅक्टेरियाची मदत घेणार आहे. एका नव्या आभ्यासानुसार ही माहिती समोर आली आहे. वॅनीलिन नावाचे एक कंपाउंड असते ते वॅनीलाप्रमाणे दरवळते तसेच स्वाद उत्पन्न करते.

    प्राकृतिक पद्‌धतीनुसार हे वॅनीला बीन्स पासून काढण्यात येते. परंतु 85 टक्के वॅनीलियन जीवाश्म इंधनापासून मिळणाऱ्या रसायनापासून तायार केले जाते. वॅनीलियनचा वापर जेवणात, कॉस्मेटीक, स्वच्छतेत, तसेच हर्बिसाइड प्रोडक्टमध्ये करण्यात येते. अभ्यासानुसार वॅनीलियनची संपूर्ण देशात मागणी वाढत चालली आहे. 2018 साली वॅनीलियन 37 हजार मॅट्रीक टन मागवण्यात आले होते. तसेच पुढील काळात 2025 पर्यंत याची मागणी 59 हजार मॅट्रीक टनपर्यंत होऊ शकते.