VIDEO! ऑस्ट्रेलियात खलिस्तानी समर्थकांचा भारतीयांवर हल्ला; पाच जखमी, व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल…

ऑस्ट्रेलियात देशातील वाढत्या खलिस्तान समर्थकांच्या हल्ल्याच्या विरोधात मेलबर्नमधील फेडरेशन स्क्वेअरवर निदर्शने केली होती. यावेळी खलिस्तानी यांनी निदर्शन करणाऱ्यांवर हल्ला केला. दरम्यान, भारतीयांवर तलवार घेऊन येणाऱ्या खलिस्तान्याला फेडरेशन स्क्वेअरवर पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त ऑस्ट्रेलियन हिंदू मीडियाने दिले आहे.

    मेलबर्न– ऑस्ट्रेलियात (Australia) एक धक्कादायक घटना घडली आहे. ऑस्ट्रेलियात काही खलिस्तानी (khalistani) समर्थकांनी हातात राष्ट्रध्वज घेऊन भारतीयांवर (Indian) हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा निषेध करण्यात येत असून, ज्यांनी हल्ला केला आहे, त्यांच्या पोलीस शोध घेताहेत. दरम्यान, या घटनेत पाच जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत ऑस्ट्रेलिया टुडेने ट्विटरद्वारे माहिती दिली असून, सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. तसेय या घटनेचा निषेध करण्यात आहे.

    दरम्यान, ऑस्ट्रेलियात देशातील वाढत्या खलिस्तान समर्थकांच्या हल्ल्याच्या विरोधात मेलबर्नमधील फेडरेशन स्क्वेअरवर निदर्शने केली होती. यावेळी खलिस्तानी यांनी निदर्शन करणाऱ्यांवर हल्ला केला. दरम्यान, भारतीयांवर तलवार घेऊन येणाऱ्या खलिस्तान्याला फेडरेशन स्क्वेअरवर पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त ऑस्ट्रेलियन हिंदू मीडियाने दिले आहे. तसेच जे पळून गेले त्यांचा पोलीस शोध घेताहेत. मिळालेल्या माहितीनुसार, खलिस्तान समर्थकांनी मेलबर्नच्या फेडरेशन स्क्वेअरमध्ये हल्ला केला. या घटनेच्या व्हायरल व्हिडिओमध्ये काही विद्यार्थी तिरंगा घेऊन उभे असून, खलिस्तानी समर्थक हातात खलिस्तानचे झेंडे घेऊन अचानक तेथे येतात. त्यानंतर तिरंगा हातात असलेल्या विद्यार्थ्यांचा आणि काही लोकांचा पाठलाग करतात आणि त्यांच्यावर हल्ला केल्याचं व्हीडिओत दिसत आहे.

    अटक करण्यात आलेल्या दोघांचे वय ३० आहे आणि त्यांना दंगलखोर वर्तनासाठी दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे. हिंदू ह्युमन राइट्स ऑस्ट्रेलियाच्या संचालक सारा एल गेट्स यांनी ट्विटरवर भारतीय राष्ट्रध्वज घेऊन जाणाऱ्या एका भारतीय तरुणाचा खलिस्तान समर्थकांच्या गटाने पाठलाग केल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. गेट्स यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.