चांद्रयान-3 च्या यशावर पाकिस्तानी नागरिक असा काय म्हणाला त्याचा व्हिडिओ होतोय व्हायरल

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोचं चांद्रयान-3 (Chandrayaan 3) चंद्रावर यशस्वीपणे पोहोचलं आहे. यासोबतच भारतानं नवा इतिहास रचला आहे. चांद्रयान-3 च्या लँडिंग आधीची 20 मिनिटे फार महत्त्वाची आणि आव्हानात्मक होती. मात्र, त्यावर मात करत चांद्रयान चंद्रावर (Chandrayaan 3 on Moon) दाखल झाले.

    कराची : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोचं चांद्रयान-3 (Chandrayaan 3) चंद्रावर यशस्वीपणे पोहोचलं आहे. यासोबतच भारतानं नवा इतिहास रचला आहे. चांद्रयान-3 च्या लँडिंग आधीची 20 मिनिटे फार महत्त्वाची आणि आव्हानात्मक होती. मात्र, त्यावर मात करत चांद्रयान चंद्रावर (Chandrayaan 3 on Moon) दाखल झाले. या मोहिमेवरून सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यातच आता पाकिस्तानी नागरिक असलेला एक व्यक्ती चांद्रयान-3 च्या यशावर असा काय म्हणाला त्याचा आता व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे.

    चांद्रयान-3 मोहिमेबाबत हा पाकिस्तानी नागरिक म्हणाला, ‘भारतातील लोक पैसे खर्च करून चंद्रावर जात आहेत, आम्ही फक्त चंद्रावर राहतो. पाकिस्तानात पाणी आणि वीज यांसारख्या अत्यावश्यक सुविधा मिळत नाही. त्यावर तो म्हणाला, ‘भारत पैसे गुंतवून चंद्रावर जात आहेत, आपण आधीच चंद्रावर राहत आहोत.’

    या व्हिडिओवरून एका ट्विटर युजरने म्हटले की, ‘हा मुलगा अप्रतिम आहे, त्याचे कौतुक केले पाहिजे. मी पाकिस्तानी बांधवांसाठी देवाकडे प्रार्थना करतो.’ तसेच इतर युजरने सांगितले की, ‘आम्ही चंद्रावर फक्त पाणी शोधण्यासाठी आलो आहोत, सापडले तर ते पाकिस्तानलाही देऊ.’