इराणमध्ये हिजाबविरोधात हिंसक निदर्शने; इंटरनेट सेवा बंद

इराणमध्ये अनेक आंदोलकांना अटक केल्याचेही वृत्त आहे. दरम्यान, इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांनीही महसा अमिनी यांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला असून मृत्यूची चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, इराणच्या विरोधकांचा हा सुनियोजित कारस्थान असल्याचेही अध्यक्ष रायसी सांगत आहेत.

    तेहरान : महसा अमिनी (Mahsa Amini) यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये (Iran) हिजाबविरोधातील (Hijab) निदर्शनांना हिंसक (Violent Protests) वळण लागले आहे. हिजाब जाळण्यासाठी पेटवलेली आग आता इराणमधील अनेक शहरे जाळून टाकू शकते. हिजाबविरोधात निषेध जास्त प्रमाणात पसरत दिसत आहे. काही दिवसांपूर्वी स्त्रिया हिजाब जाळत होत्या आणि आता लोक गोंधळ करून सरकारी मालमत्ता जाळण्याच्या प्रयत्न करत आहेत.

    इराणमधील अनेक शहरांमध्ये वाढता हिंसाचार पाहता लोकांनी अफवा टाळून हिंसक होऊ नये यासाठी इंटरनेट सेवा बंद (Internet Service Off) करावी लागली आहे. इराणमध्ये कमी-अधिक प्रमाणात निदर्शने होत आहेत. एके ठिकाणी आंदोलक बाहेर आले मोठ्या प्रमाणावर त्यांची गर्दी झाली. आंदोलकांनी सुरक्षारक्षकांना खूप मारहाण केली. त्यामध्ये दिवांदरेह शहरात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. इराणच्या कुर्दिश प्रदेशाचा हा भाग आहे, जिथे हिजाबविरोधात सर्वाधिक निदर्शने होत आहेत.