
शिया आणि युक्रेन (Russia and Ukraine War) यांच्यातील युद्धाला आज एक वर्ष पूर्ण झाले. मागील वर्षी 24 फेब्रुवारीला रशियन सैन्याने युक्रेनवर तिन्ही बाजूंनी जोरदार हल्ला केला होता. युक्रेनची राजधानी कीववर ताबा मिळवून झेलेन्स्की यांची सत्ता उलथून टाकण्याचा रशियाचा प्रयत्न होता.
कीव : रशिया आणि युक्रेन (Russia and Ukraine War) यांच्यातील युद्धाला आज एक वर्ष पूर्ण झाले. मागील वर्षी 24 फेब्रुवारीला रशियन सैन्याने युक्रेनवर तिन्ही बाजूंनी जोरदार हल्ला केला होता. युक्रेनची राजधानी कीववर ताबा मिळवून झेलेन्स्की यांची सत्ता उलथून टाकण्याचा रशियाचा प्रयत्न होता. पण या युद्धादरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांनाच युद्ध महागात पडल्याचे दिसत आहे. युक्रेनसोबतच्या युद्धात एका वर्षात तब्बल 9 ट्रिलियन डॉलर्सचा खर्च झाला.
रशिया आणि युक्रेन युद्धाच्या एका वर्षानंतरही रशिया अजूनही युक्रेनमधील आपल्या मुख्य ध्येयापासून दूर आहे. अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांच्या शस्त्रांनी सज्ज असलेला युक्रेन आता रशियासाठी आणखी एक ‘अफगाणिस्तान’ बनत चालला आहे, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. या युद्धात आतापर्यंत 3 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला तर 63 लाख लोक बेघर झाले आहेत.
अमेरिकेच्या न्यूजवीकच्या वृत्तानुसार, या युद्धात पुतीन यांच्या सैन्याला 1 वर्षात 9 ट्रिलियन डॉलर्सचे मोठे नुकसान झाले आहे. पाकिस्तानच्या एकूण 3 अब्ज डॉलरच्या परकीय चलनाच्या साठ्यापेक्षा हे प्रमाण 3000 पट जास्त आहे. त्याचवेळी रशियाची 300 लढाऊ विमाने आणि 6300 हून अधिक सशस्त्र वाहने नष्ट झाली आहेत. युक्रेनने केलेल्या दाव्यानुसार, या युद्धात 1,30,000 हून अधिक रशियन सैनिक मारले गेले आहेत. रशियाला या युद्धात इतके नुकसान होईल, असे वाटलेही नव्हते.
रशियाने युद्धात दररोज 90 कोटी डॉलर्स केले खर्च
बोरिस म्हणाले की, 2022 सालासाठी रशियन सरकारची एकूण खर्चाची योजना 346 अब्ज डॉलर्स इतकी होती. ज्यापैकी 46 अब्ज डॉलर्स सैन्यावर आणि 36.9 अब्ज डॉलर्स पोलीस आणि फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसवर खर्च करायचे होते. पोलिस आणि एफएसबीचे पैसेही लष्कराला दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.