Adorable Video : खतरनाक सापाची तिने घेतली पप्पी, त्याला गळ्यात घालून करतेय आराम, लोकं घामाघूम झाली ना राव

व्हिडिओसोबत कॅप्शन लिहिले आहे, 'लव्ह माय स्नेक!' या भितीदायक व्हिडिओला (Adorable Video) मोठ्या प्रमाणात लोक लाइक करत आहेत. आतापर्यंत त्याला ९,५०० लाईक्स मिळाले आहेत. सोशल मीडिया युजर्स या व्हिडिओवर जोरदार कमेंट करत आहेत. साप इतका 'गोंडस' असू शकतो असे लोकांना कधीच वाटले नव्हते.

  वॉशिंग्टन : सर्पदंशामुळे (Snake Bite) व्यक्तीचा मृत्यूही (Death) होऊ शकतो. त्यामुळे सामान्यतः लोक सापांना (Snake) घाबरतात आणि त्याला पाहून पळून जातात. पण सोशल मीडियावर व्हायरल (Viral On Social Media) होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका मुलीने आपल्या गळ्याभोवती साप लपेटून घेतल्याचे दिसत आहे. मुलगी घाबरण्याऐवजी त्या सापाचे चुंबन (Kiss Of Snake) घेत आहे. ही क्लिप (Adorable Video) ‘royal_pythons’ नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आली आहे.

  व्हिडिओसोबत कॅप्शन लिहिले आहे, ‘लव्ह माय स्नेक!’ या भितीदायक व्हिडिओला (Adorable Video) मोठ्या प्रमाणात लोक लाइक करत आहेत. आतापर्यंत त्याला ९,५०० लाईक्स मिळाले आहेत. सोशल मीडिया युजर्स या व्हिडिओवर जोरदार कमेंट करत आहेत. साप इतका ‘गोंडस’ असू शकतो असे लोकांना कधीच वाटले नव्हते. व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये मुलगी पाळीव सापासोबत पलंगावर झोपलेली दिसत आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Royal Pythons (@royal_pythons_)

  मुलीने सापाचे चुंबन घेतले

  साप मुलीच्या अंगावर पडलेला असतो आणि जेव्हा तिने तिचे डोके मुलीच्या तोंडाजवळ नेले तेव्हा ती त्याचे चुंबन (Kiss To Snake) घेते. मुलीचे चुंबन घेतल्यानंतर साप आश्चर्याने तोंड उघडतो आणि तिच्याकडे पाहतो. हे पाहून ती मुलगीही आश्चर्यचकित होऊन सापाला ‘आय लव्ह यू’ म्हणते. व्हिडिओ पाहून अनेकांनी प्रेमळ कमेंट्स करत ‘Awww’ असे लिहिले.

  साप आणि माणसाची मैत्री काही नवीन नाही

  काही इंस्टाग्राम युजर्सना हा व्हिडिओ क्युट वाटला तर काहींना या सापामुळे मुलीला काही इजा झाली नसेल यावर विश्वास बसत नाही. मात्र, साप आणि माणसाची मैत्री पहिल्यांदाच चर्चेत आलेली नाही. याआधी आठ वर्षांच्या इस्रायली मुलीचा तलावात पोहतानाचा व्हिडिओ समोर आला होता, ज्याने सर्वांनाच धक्का बसला होता. तलावात मुलगी एकटी नव्हती, तिचा पाळीव अजगरही तिच्यासोबत पाण्यात पोहत होता.