
चर्चेत असलेल्या या व्हिडिओवर पाकिस्तानी अभिनेता सामी खानने व्हिडिओ शेअर करत, नाराजी व्यक्त केली आहे. सामी खानने लिहिले की, 'हा तोच देश आहे जिथे एक गरीब माणूस आपल्या मुलांसाठी पिठाच्या रांगेत मरतो. तर दुसरीकडे असा धक्कादायक प्रकार घडतो. अशी पोस्ट लिहिली आहे.
कराची- सध्या पाकिस्तानमध्ये (Pakistan) आर्थिक संकट घोंगावत आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठीही सर्वसामान्यांची अडचण होत आहे. भाजीपाल्यासाठीही लोकांकडे पैसे कमी पडत असल्याची परिस्थिती आहे. तर चिकन मटन (Chiken matan) खाणे हे आता स्वप्नवत झाले आहे. तर भाकरीच्या पाठीसाठी लांबच लांब रांगा लावल्य़ा जाताहेत. या संकटाच्या (Economics problems) काळात शेजारच्या देशातून एक व्हिडिओ समोर आला आहे, त्यामुळं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. जिथे एका लग्नात नोटांचा पाऊस पडत आहे. आणि हे पैसे जमा करण्यासाठी लोकांची तुफान गर्दी झाली आहे. हा व्हीडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दरम्यान, चर्चेत असलेल्या या व्हिडिओवर पाकिस्तानी अभिनेता सामी खानने व्हिडिओ शेअर करत, नाराजी व्यक्त केली आहे. सामी खानने लिहिले की, ‘हा तोच देश आहे जिथे एक गरीब माणूस आपल्या मुलांसाठी पिठाच्या रांगेत मरतो. तर दुसरीकडे असा धक्कादायक प्रकार घडतो. अशी पोस्ट लिहिली आहे. या प्रकारावरुन पाकिस्तानी अभिनेता सामी खानने प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.
कोण आहे समी खान?
सामी हे पाकिस्तानी सिनेसृष्टीतील मोठे नाव आहे. तो अनेक ड्रामा शोमध्ये लीड म्हणून दिसला आहे. त्याचे नाव मन्सूर अस्लम खान नियाझी आहे, परंतु सिनेमात त्याला सामी म्हणून ओळखले जाते
लग्नात पैशांचा पाऊस
हा व्हिडिओ पाकिस्तानच्या मंडी बहाउद्दीन शहरात पार पडलेल्या पाकिस्तानच्या भव्य लग्नाचा आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये छतावरून पैशांचा पाऊस पडत आहे, तर घराबाहेर उभे असलेले लोक मासेमारीच्या जाळ्यांमधून पैसे गोळा करत आहेत. नोटांच्या पावसाचा हा व्हिडीओ पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे