चोरी करायला गेला आणि खिडकीत डोकं अडकून बसला, प्रयत्न गेले फुकट शेवटी पोलिसचं झाले प्रकट

मेक्सिकोमध्ये एक चोर घरात चोरी करण्यासाठी आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, तितक्यात त्याचा पाय घसरला आणि त्याचं डोकं रेलिंगमध्ये अडकून बसलं. ही घटना मेक्सिकोच्या मोरेलियामध्ये मागील आठवड्यात घडली. इथे एक चोर एका घरामध्ये चोरी करण्यासाठी घरामध्ये घुसण्याचा प्लॅन करत होता. घराबाहेर सुरक्षिततेसाठी मोठमोठे रेलिंग लावले गेले होते. हा चोर त्याच्यावर चढून घरात जाण्याचा प्रयत्न करत होता.

    चोर हे कित्येक ठिकाणी मोठमोठ्या चोरी करुनही पकडले जात नाहीत. मात्र, कधी कधी अशीही वेळ येते जेव्हा चोरांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा अगदी अशाही घटना घडतात जेव्हा चोरी करताना त्यांचा जीवदेखील धोक्यात येतो. अशीच एक घटना मेक्सिकोमध्ये घडली आहे.

    मेक्सिकोमध्ये एक चोर घरात चोरी करण्यासाठी आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, तितक्यात त्याचा पाय घसरला आणि त्याचं डोकं रेलिंगमध्ये अडकून बसलं. ही घटना मेक्सिकोच्या मोरेलियामध्ये मागील आठवड्यात घडली. इथे एक चोर एका घरामध्ये चोरी करण्यासाठी घरामध्ये घुसण्याचा प्लॅन करत होता. घराबाहेर सुरक्षिततेसाठी मोठमोठे रेलिंग लावले गेले होते. हा चोर त्याच्यावर चढून घरात जाण्याचा प्रयत्न करत होता.

    या घटनेदरम्यान चोराचा पाय घसरला आणि यानंतर त्याचं डोकं थेट रेलिंगमध्ये अडकून बसलं. काही लोकांनी चोर तिथे अडकल्याचं पाहिलं आणि पोलीस तसंच आपात्कालीन सेवा दलाला याबद्दल माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. या काळात चोर रेलिंगमध्येच अडकलेला होता. जेव्हा तो रेलिंगमध्ये अडकला होता तेव्हा काही लोकांनी चोराचा व्हिडिओदेखील बनवला. हा व्हिडिओ नंतर चांगलाच सोशल मीडियावर व्हायरल झाला. पोलिसांनी मेटल करटच्या मदतीनं लोखंडाचे रॉड कापून चोराला सुखरुप बाहेर काढलं. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.