काय सांगता? कोरोना विषाणू २० हजार वर्षं जुना ; यापूर्वीही पृथ्वीवर घातलंय थैमान

कोरोना विषाणूसारख्या साथीशी भविष्यात कशाप्रकारे लढता येईल, याचा माहिती आपल्याला इतिहासात सापडेलेल्या आनुवांशिक घटकांमुळे होऊ शकते, असंही या संशोधनात म्हटलं आहे. संबंधित साथीचे आजार मानवी इतिहासा एवढेच जुने आहेत. यापूर्वीही मानव जातीनं अनेक जागतिक महामारीचा सामना केला आहे.

    नवी दिल्ली : संपूर्ण जगाला दीड वर्षांपासून वेठीस धरणाऱ्या कोरोना विषाणूबाबत एक धक्कादायक माहिती मिळाली आहे. हा विषाणू नवा नसून २० हजार वर्ष जुना आहे.एका संशोधनातून हे समोर आले आहे. एवढंच नव्हे, तर कोरोना विषाणूनं यापूर्वीही वेगळ्या रुपात अशाचप्रकारे संपूर्ण जगभर थैमान घातलं होतं. त्यावेळीही असंख्य लोकांचा मृत्यू कोरोना विषाणूमुळे झाला होता.

    ज्या कोरोना विषाणूचा उद्भाव अलीकडेच चीनमध्ये झाला आहे असा आपला समज आहे. मात्र या नव्या संशोधनाने वेगळीच माहीत जगासमोर आली आहे.याबाबतच संशोधन अलीकडेच ‘करंट बायोलॉजी’ या मासिकात प्रकाशित करण्यात आलं आहे. या संशोधनानुसार, कोरोना विषाणूचा उद्भाव २० हजार वर्षांपूर्वीचा आहे. याबाबतचे अवशेष आधुनिक चीन, जपान आणि व्हियतनाममधील नागरिकांच्या डीएनएमध्ये सापडल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. आधुनिक लोकसंख्येतील ४२ जनुकांमध्ये कोरोना विषाणूचे अनुवांशिक घटक सापडले आहेत. यामध्ये MERS आणि SARS या विषाणूंचा देखील समावेश आहे. यामुळे मागील वीस वर्षात अनेक घातक रोगांचा उद्भाव झाल्याचा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे.

    कोरोना विषाणूसारख्या साथीशी भविष्यात कशाप्रकारे लढता येईल, याचा माहिती आपल्याला इतिहासात सापडेलेल्या आनुवांशिक घटकांमुळे होऊ शकते, असंही या संशोधनात म्हटलं आहे. संबंधित साथीचे आजार मानवी इतिहासा एवढेच जुने आहेत. यापूर्वीही मानव जातीनं अनेक जागतिक महामारीचा सामना केला आहे. या संशोधनासाठी जगभरातील २६ देशातील २,५०० लोकांचे जनुके संशोधनासाठी घेण्यात आले होते. मानवाच्या शरीरात ४२ वेगवेगळ्या जनुकांमध्ये कोरोना विषाणूच्या कुटुंबाचे अंश आढळले आहेत.