WHO ने व्यक्त केली चिंता! कोरोनानंतर आता डिजीज X रोगाचा धोका

    कोरोना बाधितांची वाढती संख्या पाहता चीनने अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन लागू केले आहे. अशातचं आता जागतिक आरोग्य संघटनेच्या नव्या अहवालामुळे लोकांमध्ये आणखी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोविडचा दुसरा व्हेरियंट आला आणि डिजीज X ची चर्चा सुरू झाली. 2021 मध्ये, शास्त्रज्ञांचा असा विश्वास होता की भविष्यातील हा रोग इबोलापेक्षा जास्त प्राणघातक ठरू शकतो. या विषाणूजन्य आजाराने ग्रस्त सुमारे 80 टक्के रुग्णांचा मृत्यू होतो. हा आजार सहसा पश्चिम आफ्रिकेत आढळतो.

    इबोला विषाणूच्या शोधात महत्त्वाची भूमिका बजावणारे शास्त्रज्ञ जीन जॅक यांनीही डिजीज एक्स रोगाबाबत इशारा दिला. त्यांचा असा विश्वास आहे की, डिजीज X रोगाबद्दल कोणालाही काहीही माहिती नाही. कोविडच्या आधी डिजीज X वर चर्चा झाली होती. शास्त्रज्ञांनी त्याचे धोकेही सांगितले होते. पण त्यानंतर कोरोनाने 2 वर्षे कहर केला. चीन वगळता जगभर परिस्थिती नियंत्रणात आहे. पण पुन्हा एकदा डिजीज X ने लोकांची चिंता वाढवली आहे.

     

    डिजीज X म्हणजे काय?

    शास्त्रज्ञांच्या मते, डिजीज X पूर्णपणे अज्ञात आणि अप्रत्याशित आहे. सध्या त्याबद्दल फारशी माहिती नाही. पण शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, हा विषाणू खूप धोकादायक असेल आणि तो कोरोनापेक्षाही वेगाने पसरेल. भविष्यात डिजीज रोग पसरण्याची शक्यता आहे. या रोगावरील संशोधनासाठी, WHO ने 300 शास्त्रज्ञांची एक टीम तयार करत आहे जे भविष्यात साथीच्या रोगांना कारणीभूत ठरू शकणारे जीवाणू आणि विषाणू ओळखतील. यासोबतच ही टीम या सूक्ष्मजंतूंची लस आणि उपचार यावरही काम करणार आहे.