अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारतातील राजदूत सर्जियो गोर (फोटो सौजन्य: एक्स/@SergioGor)
America News in Marathi : वॉशिंग्टन : अमेरिकेने (America) भारतातील राजदूत म्हणून सर्जियो गोर यांची निवड केली आहे. याबद्दल त्यांनी डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे आभार मानले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर सर्जियो यांनी आनंद व्यक्त केला आहे. मंगळवारी (११ नोव्हेंबर) त्यांनी आपल्या पदाची शपथ घेतली.
H-1B व्हिसावर ट्रम्प यांचा मोठा युटर्न! म्हणाले अमेरिकेला उत्कृष्ट आणि कुशल कामगारांची गरज
यावेळी ट्रम्प यांनी त्यांचे चांगले मित्र म्हणून वर्ण केले. तसेच त्यांच्याकडे भारत आणि पंतप्रधान मोदींशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याची जबाबदारी सोपवली. ट्रम्प यांनी विश्वास व्यक्त केली की, सर्जियो गोर पुन्हा अमेरिका आणि भारतातील संबंध मजबूत करतील.
सर्जियो गोर यांचे नाव यापूर्वीही अनेक वेळा चर्चेत आले आहे. सर्जियो यांनी रिपब्लिकन पक्षाचे धोरणाकार, निधी संकलन अधिकारी म्हणून काम केले आहे. तसेच चे ट्रम्प यांचे जवळेच सहकारी म्हणूनही ओळखले जातात. ऑगस्ट २०२५ मध्ये ट्रम्प यांनी सर्जियो यांची भारतातील अमेरिकन राजदूत आणि दक्षिण-मध्य आशियातील विशेष दूत म्हणून निवड केली. शिवाय सर्जियो यांनी ट्रम्प सरकारमध्ये राष्ट्राध्यक्षीय कर्मचारी संचालक म्हणूनही कामकाज पाहिले आहे. तसेच त्यांनी ट्रम्प यांच्या अनेक मुख्य कामांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
Very much looking forward to being the new U.S. Ambassador to India. Thank you @POTUS @realDonaldTrump! I’m deeply grateful for this opportunity and committed to honoring the faith you’ve shown in me. 🇺🇸
Photo: @dougmillsnyt pic.twitter.com/jeGu95hKXk — Sergio Gor (@SergioGor) November 11, 2025
सर्जियो यांनी म्हटले आहे की, भारतातील अमेरिकन राजदूत म्हणून माझी निवड झाल्याचा मला आनंद आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे मी आभार मानतो. त्यांना माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाचा मी आदर करतो, तसेच मला दिलेली जबाबदारी मी पूर्णपमे पार पाडेल. ट्रम्प यांनी सर्जियो यांची निवड केल्यानंतर म्हटले की, सर्जियो भारतासोबतच अमेरिकेचे संबंध अधिक मजबूत करण्यावर कार्य करतील. यामुळे सर्वात महत्त्वाच्या देशासोबत आमचे आंतरराष्ट्रीय संबंध आणखी मजबूत होतील.
एच-१बी व्हिसा प्रणालीत होणार बदल
याच वेळ ट्रम्पकडून अमेरिकेच्या एच-१बी व्हिसा प्रणालीत पुन्हा एकदा मोठे बदल होण्याचे संकेत मिळाले आहे. पण यावेळी हे बदल सकारात्म असतील. नुकतेच ट्रम्प यांनी अमेरिकेला कुशल आणि उत्कृष्ट कामगारांची कमतरता पडत असल्याचे म्हटले आहे. यामुळे सध्या सर्व एच-१बी व्हिसा धारकांचे लक्ष ट्रम्प काय बदल करतील याकडे लक्ष लागले आहे.
“भारतीय माझ्यावर पुन्हा प्रेम करतील”, डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले भारतावरील टॅरीफ कमी करण्याचे संकेत
Ans: भारतातील अमेरिकन राजदूत म्हणून सर्जियो गोर यांची निवड करण्यात आली आहे.
Ans: ट्रम्प यांनी सर्जियो गोर यांच्याकडे भारत आणि पंतप्रधान मोदींशी अमेरिकेचे संबंध पुन्हा मजबूत करण्याची जबाबदारी सोपवली आहे.






