कैद्याला फाशीची घाई काय? मला या जगात राहायचं नाय… 

जपानमध्ये (Japan) मृत्यूदंडाच्या शिक्षेचे एक प्रकरण समोर आलं असून या ठिकाणी एका व्यक्तीला मागील ४८ वर्षांपासून मृत्यूदंडाची शिक्षा (death penalty) देण्यासाठी ताटकळत (Death row awaiting) ठेवण्यात आलं आहे.

एखाद्या आरोपीने भयंकर मोठा गुन्हा (Crime)  केला असता, त्याला तात्काळ फाशीची शिक्षा (death penalty) ठोठावण्यात येते. परंतु एका देशामध्ये गुन्हेगाराला फाशी देण्याचा फंडा जरा वेगळाच आहे. अशाच एका गुन्हेगाराला फाशी न देता तुरूंगात डांबून ठेवल्यामुळे तो आता फशीची म्हणजेच मृत्यूची वाट पाहत आहे. ही धक्कादायक घटना जपानमध्ये घडली आहे. जपानमध्ये (Japan) मृत्यूदंडाच्या शिक्षेचे एक प्रकरण समोर आलं असून या ठिकाणी एका व्यक्तीला मागील ४८ वर्षांपासून मृत्यूदंडाची शिक्षा देण्यासाठी ताटकळत (Death row awaiting) ठेवण्यात आलं आहे.

ही घटना थोडीशी हास्यास्पद असून गुन्हेगार चक्क मृत्यूची वाट पाहत आहे. यामुळे या व्यक्तीच्या नावाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये (Guinness World Records) करण्यात आली असून इतका दीर्घकाळ फाशीच्या शिक्षेची वाट पाहणारा तो पहिलाच माणूस आहे. ८४ वर्षीय इवाओ हाकमाडा (Iwao Hakamada) असे या व्यक्तीचे नाव असून ४८ वर्षांपूर्वी त्याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. परंतु त्याची अंमलबजावणी अद्याप करण्यात आलेली नाही.

हा आरोपी तुरूंगात कसा? त्यानं काय केलं…

या आरोपीने आपला बॉस, त्याची पत्नी आणि मुलांची हत्या केल्याप्रकरणी १९६६ मध्ये अटक करण्यात आली होती. जपानमधील शिजूओका (Shizuoka) मध्ये चाकूने या सर्वांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणात त्याच्यावर दरोडा आणि खुनाचा आरोप करत त्याला अटक केली होती. सुरुवातीला त्याने या हत्या प्रकरणात आपण हा गुन्हा केल्याचं कबुल केलं होतं. परंतु त्यानंतर त्याने हा आरोप चुकीचा असल्याचं म्हटलं. पोलिसांनी आपल्याला मारहाण करत आपल्याकडून खुनाचा आणि दरोड्याचा गुन्हा कबुल करून घेतल्याचा आरोप त्याने केला होता. परंतु पोलिसांनी सदर पुरावे सादर केल्याने त्याला कोर्टाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली.