चीन आणि अमेरिकेत युद्ध होणार का? तैवानच्या चारही बाजूंनी का उभी करतोय अमेरिका तटबंदी? काय आहे कारण?

अमेरिकन मरीन कोअरची (United States Marine Corps) नवी युनिट्स सध्या तैवानच्या जवळपास आहेत. लवकरच तैवानच्या आजूबाजूला असलेल्या परिसरात ते त्यांची पोझिशन्स घेणार आहेत. या घटनाक्रमावरुन चीन आणि त्याचा परंपरागत प्रतिस्पर्धी अमेरिका (China and America) हे एकमेकांसमोर उभे ठाकण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

  वॉशिंग्टन : अमेरिकन मरीन कोअरची (United States Marine Corps) नवी युनिट्स सध्या तैवानच्या जवळपास आहेत. लवकरच तैवानच्या आजूबाजूला असलेल्या परिसरात ते त्यांची पोझिशन्स घेणार आहेत. या घटनाक्रमावरुन चीन आणि त्याचा परंपरागत प्रतिस्पर्धी अमेरिका (China and America) हे एकमेकांसमोर उभे ठाकण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. त्यासाठीची तयारी दोन्ही देशांकडून सुरु झाल्याचं मानण्यात येतंय. तैवनावर चीनने नेहमीच त्यांचा हक्क सांगितला आहे. अलिकडच्या दिवसांत घडलेल्या काही महत्त्वाच्या घडामोडीत, चीनच्या 34 लष्करी जेट्सनी तैवानच्या (Taiwan) जवळून फेरी मारल्याची माहिती आहे. या  घटनेनंतर जागतिक पटलावर संशयाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. या गटनेनंतर तैवानच्या नौदलानं त्यांची मिसाईल डिफेन्स सिस्टिम एक्टिव्ह केल्याचंही सांगण्यात येतंय. तसंच तैवनाच्या लष्कराला हाय अलर्टवर राहण्याचे आदेश देण्य़ात आले आहेत.

  अमेरिकेचे हिंद-प्रशांत महासागरात युनिट्स

  अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयजड ऑस्टिन यांनी जाहीर केले आहे की, मरीन आर्टिलरी रेजिमेंट जी जपानच्या ओकिनावामध्ये तैनात आहे. तिला 2025 सालापर्यंत मरीन समुद्रतटावरील रेजिमेंट म्हणून ओळखले जाईल. या  रेजिमेंटला अत्याधुनिक गुप्तचर यंत्रणा, निगराणी आणि रेकी सिस्टिमसाठी उपयुक्त साधनांनी परिपूर्ण करण्यात येणार आहे. यासोबतच या रेजिमेंटसोबत एन्टी शिप हत्यारंही असतील. त्यामुळं भविष्यात कुठल्याही मोठ्या संकटाचा मुकाबला ही रेजिमेंट करु शकेल. 12 वी मरीन तटीय रेजिमेंट ही 3 तटीय रेजिमेंटचा एक भाग आहे, जिला हिंद-प्रशांत महासागरात तैनात करण्यात आलेलं आहे. 2022 साली पहिल्यांदा अशा प्रकारची रेजिमेंट तैनात करण्यात आली होती. या रेजिमेंटंचा तळ हवाई येथे आहे.

  जपानमध्ये रेजिमेंटचा तळ कशासाठी?

  या  सगळ्या परिसरात अमेरिकेची निगराणी वाढावी, हाही यामागचा मुख्य उद्देश आहे. या रेजिमेंटला गेल्या काही काळापासून अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज करण्याचं काम सुरु करण्यात आलेलं आहे. या  तटावरील रेजिमेंट या नेहमीच शत्रुंच्या हत्यारांच्या आणि शत्रूराष्ट्रांच्या रेंजमध्ये राहतात. त्यामुळे  या रेजिमेंटला बेस जपानमध्ये ठेवण्यात आलेला आहे.

  चीनपासून सर्वात मोठा धोका असल्याचं गेल्या काही वर्षआंपासून अमेरिकेला वाटतं आहे. दोन दशकांनंतर जमिनीवर होणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी तटांवरील रेजिमेंटची मदत आता घेण्यात येते आहे. जपान आणि फिलिपाईन्स हे देन्ही देश अमेरिकेसोबत आहेत. या दोन्ही देशांनी चीनशी वाढत्या तणावामुळं अमेरिकेशी सहकार्य वाढवल्याची माहिती आहे. या  दोन्ही देशांच्या सीमा या चीनला लागून असल्यानं त्यांचा नेहमी बिजिंगशी वाद सुरु असतो.

  चिनी सैन्यही रेड अलर्टवर

  ऑगस्ट 2022 मध्ये जेव्हा अमेरिकेच्या स्पीकर नेन्सी पेलोसी या तैवानला गेल्या होत्या. त्यावेळी संतापलेल्या चीननं मिसाईल्स डागले होते. हे क्षेपणास्त्र जपानमध्ये जाऊन पडले होते. तैवान पासून जपानचे वादग्रस्त क्षेत्र हे केवळ 60 मैलांवर आहे. त्यामुळे नेहमीच जपानला मोठ्या हल्ल्याची भीती वाटतेय. अमेरिका आणि त्याच्या सहकारी राष्ट्रांचे लक्ष सध्या मात्र तैवानवर आहे. चीनवर निर्माण झालेल्या अमेरिका आणि मित्रराष्ट्रांच्या दबावानं तैवानही सुखावलेला आहे. दुसरीकडं तैवानच्या आजूबाजूला चिनी सैन्याच्या हालचालीही गतीने वाढताना दिसतायेत.