भारतासोबत संबंध सुधारावेत अशी इच्छा, पण भाजपमुळे शक्य नाही- इम्रान खान

फायदे खूप असतील, पण काश्मीरचा मुद्दा हा मुख्य अडथळा आहे. मला वाटते हे शक्य आहे, पण भाजप सरकार खूप कट्टर आहे. अनेक मुद्द्यांवर त्यांची राष्ट्रवादी भूमिका आहे, असे इम्रान खान म्हणाले. ते सतत राष्ट्रीय भावनांना फुंकर घालत असल्याने कोणताही करार न होणे निराशाजनक आहे. एकदा हा राष्ट्रवादाचा जीन बाटलीतून बाहेर पडला की, त्याला पुन्हा आत घालणे कठीण आहे, असेही इम्रान यांनी म्हटले आहे. काश्मीर मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी योग्य योजना हवी, असेही मत त्यांनी मांडले.

    इस्लामाबाद – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Pakistan PM Imran Khan)यांनी भारतासोबत संबंध सुधारावेत अशी आपली इच्छा असल्याचे सांगितले. मात्र, भारतात भाजप (BJP) सत्तेत असताना ते होण्याची शक्यता नाही, असेही ते म्हणाले. एका मुलाखतीत इम्रान खान यांनी दोन्ही देशांनी एकमेकांशी व्यापार (Business) केल्यास कोणते आर्थिक फायदे (Financial Benefits) होऊ शकतात यावर भाष्य केले आहे.

    फायदे खूप असतील, पण काश्मीरचा (Kashmir) मुद्दा हा मुख्य अडथळा आहे. मला वाटते हे शक्य आहे, पण भाजप सरकार खूप कट्टर आहे. अनेक मुद्द्यांवर त्यांची राष्ट्रवादी भूमिका आहे, असे इम्रान खान म्हणाले. ते सतत राष्ट्रीय भावनांना फुंकर घालत असल्याने कोणताही करार न होणे निराशाजनक आहे. एकदा हा राष्ट्रवादाचा जीन बाटलीतून बाहेर पडला की, त्याला पुन्हा आत घालणे कठीण आहे, असेही इम्रान यांनी म्हटले आहे. काश्मीर मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी योग्य योजना हवी, असेही मत त्यांनी मांडले.

    भारताने पाकिस्तानला अनेकदा दहशतवाद, शत्रुत्व आणि हिंसामुक्त वातावरणात आपले संबंध सामान्य व्हावेत असे सांगितले आहे. मात्र, भारत सरकारने ३७० कलम हटवत काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यानंतर संबंध कटू झाल्याचे इम्रान खान यांनी सांगितले.