ती महिला अधिकारी अल्पवयीन मुलासोबत जबरदस्तीने ठेवायची शारिरीक संबंध,अखेर पितळं पडलं उघडं – झाली शिक्षा

ब्रिटनमध्येही (Britain) अशीच एका धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका महिला कस्टडी अधिकाऱ्यानं (Female Custody Officer done Sexual Harassment ) एका १५ वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे.

  लंडन : लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या(Sexual Harassment) घटना वाढल्या आहेत. दिवसेंदिवस ही विकृती वाढत आहे. लहान वयातील मुलं याला बळी पडत आहेत. अनेकदा जवळचे लोकच मुलांवर असे अत्याचार करत असल्याचं आढळलं आहे. ब्रिटनमध्येही (Britain) अशीच एका धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका महिला कस्टडी अधिकाऱ्यानं (Female Custody Officer) एका १५ वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे.

  या महिला अधिकाऱ्याकडं काळजी घेण्यासाठी पाठवण्यात आलेल्या या मुलाबरोबर तिनं शारीरिक संबंध ठेवले. तसंच त्याला ती आक्षेपार्ह संदेशही पाठवत असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे न्यायालयानं या महिलेला दोषी ठरवलं आहे. तसंच तिला २ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तिचं नाव दहा वर्षांसाठी लैंगिक अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांच्या यादीत नमूद करावं असा आदेशही दिला आहे.

  लेसेस्टरशायरमधील कस्टडी ऑफिसर ॲशले राईट (Ashley Wright) हिनं डिसेंबर २०१८ ते जून २०१९ दरम्यान त्या मुलावर अत्याचार केल्याचं आढळलं आहे. पीडित मुलाला मिल्टन केन्स सिक्योर ट्रेनिंग फॅसिलिटी येथं पाठवण्यात आलं होतं. तिथं कस्टडी ऑफिसर म्हणून ॲशले राईट काम करत होती. त्यावेळी तिनं या मुलाशी बळजबरीनं शारीरिक संबंध (Physical Relations) ठेवले.

  या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांना तिनं त्या मुलाला पाठवलेले अनेक आक्षेपार्ह संदेश तसंच अश्लील फोटो आढळले. ॲशले शलेच्या घराची झडती दरम्यान तिच्या बेडरूममध्ये तसंच मोबाइलमध्ये तिचे त्या मुलाबरोबरचे फोटो पोलिसांना सापडल्याचं क्राउन प्रॉसिक्युशन सर्व्हिसच्या प्रवक्त्याने सांगितलं.

  ॲशले शलेनं त्या मुलाला, मी तुझ्याबरोबर झोपण्यासाठी आणखी प्रतीक्षा करू शकत नाही. ‘बेब, तू त्या फोटोमध्ये सेक्सी दिसत आहेस’,अशा प्रकारचे संदेश पाठवल्याचंही आढळलं आहे. याआधीही ॲशलेला  १३ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांबरोबर लैंगिक अत्याचार करण्यासाठी दोषी ठरवण्यात आलं होतं. एका कर्मचार्‍यानं एका लहान मुलाबरोबर आक्षेपार्ह कृत्य करताना पाहिल्यानं तिचे हे कारनामे उघडकीस आले होते.

  या खटल्याच्या सुनावणीदरम्यान किंग्स्टन क्राउन कोर्टानं ॲशलेवरील आरोप गंभीर असल्यानं तिला त्यासाठी शिक्षा मिळालीच पाहिजे,असं स्पष्ट करत तिला दोन वर्षांची शिक्षा सुनावली.