हिजाब न घालणाऱ्या महिलेचा पोलीस चौकशीत मृत्यू; इराणमध्येही नो टू हिजाब

इराणमधील महिला आता इराण पोलिसांच्या विरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत. इराण पोलिसांना विरोध दर्शवत इराणमधील महिला या हिजाब जाळत आहेत; तसेच त्या लांब केसदेखील कापत आहेत. महसा अमिनीला न्याय मिळण्यासाठी इराणच्या महिला आंदोलन करत आहेत. काही इराणी महिला हिजाब न परिधान करुन महसा अमिनीसाठी न्याय मागत आहेत.

    तेहरान : इस्लामिक देश (Islamic Country) असलेल्या इराणमध्ये (Iran) हिजाबविरुद्ध चळवळीला (Hijab Movement) सुरुवात झाला आहे. इराणमधील महिला या सध्या पोलीस आणि सरकारविरोधात आंदोलन करत आहेत. हिजाब परिधान न केल्याने पोलिसांनी महसा अमिनी (Mahsa Amini) नावाच्या महिलेला अटक केली. अटकेत असताना महसा अमिनीचा मृत्यू झाला. त्यामुळे आता इराणमधील महिला संतप्त झाल्या आहेत.

    इराणमधील महिला आता इराण पोलिसांच्या विरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत. इराण पोलिसांना विरोध दर्शवत इराणमधील महिला या हिजाब जाळत आहेत; तसेच त्या लांब केसदेखील कापत आहेत. महसा अमिनीला न्याय मिळण्यासाठी इराणच्या महिला आंदोलन करत आहेत. काही इराणी महिला हिजाब न परिधान करुन महसा अमिनीसाठी न्याय मागत आहेत. आपला संताप व्यक्त करत शनिवारी शेकडो लोकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.

    सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये अनेक महिला चेहऱ्यावरून हिजाब काढून निषेध दर्शवताना दिसत आहेत. सक्केज या महसा अमिनीच्या होम टाऊनमध्ये देखील महिला रस्त्यावर उतरुन सरकारविरोधात आंदोलन करत आहेत. सध्या इराणमध्ये ‘नो टू हिजाब’ (No To Hijab) हे कॅम्पेन सुरु आहे.