तीन दिवस लिफ्टमध्ये अडकल्याने ‘ती’ ओरडतच राहिली; तरीही कोणीही आले नाही मदतीला, अखेर…

लिफ्टमधून जाताना अनेकदा काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. कारण कधी काय होईल हे सांगता येत नाही. असा काहीसा प्रकार उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंदमध्ये घडला आहे. पोस्टात काम करणारी 32 वर्षीय महिला तीन दिवसांपासून लिफ्टमध्ये अडकली होती.

    ताश्कंद : लिफ्टमधून जाताना अनेकदा काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. कारण कधी काय होईल हे सांगता येत नाही. असा काहीसा प्रकार उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंदमध्ये घडला आहे. पोस्टात काम करणारी 32 वर्षीय महिला तीन दिवसांपासून लिफ्टमध्ये अडकली होती. लिफ्टमध्ये अडकल्यानंतर (Woman Died in Lift) तिने जोरजोरात आरडाओरड केली. मात्र, तरीदेखील तिला वाचवण्यासाठी कोणीही आले नाही. अखेरचा तिचा लिफ्टमध्ये जीव गेला.

    ओल्गा लिओनतेवा असे या महिलेचे नाव आहे. ती एका अपार्टमेंटच्या नवव्या मजल्यावर अडकली आणि ओल्गा मदतीसाठी ओरडली पण तिचे रडणे कोणी ऐकले नाही. कामावरून ती घरी न परतल्याने कुटुंबीयांनी 24 जुलै रोजी हरवल्याची तक्रार नोंदवली. मात्र, बराच शोध घेतल्यानंतर लिफ्टच्या आत ओल्गाचा मृतदेह सापडला. ओल्गाला 6 वर्षांची मुलगी आहे. लिफ्टची निर्माता कंपनी ही चीनची आहे. या लिफ्टसंदर्भात अनेक तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्याची वेळीच दखल घेतली गेली नाही. त्यामुळे या महिलेला जीव गमवावा लागला.

    दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी या घटनेची चौकशी सुरु केली आहे. लिफ्ट बनवणारी चिनी कंपनी होती, जी कामाच्या स्थितीत होती पण त्याचं रेकॉर्ड नव्हता. दुसरीकडे, वीज विभागाचे म्हणणे, लिफ्टमध्ये बिघाड झाल्याने हा अपघात झाला असावा, असा रहिवाशांचा अंदाज आहे. लिफ्टचा अलार्म यंत्रणा नीट काम करत नसल्याचेही रहिवासी आणि अधिकाऱ्यांनी सांगितले.