W. Yenosco gives cultural heritage status to Durga Puja in Bengal! This moment of pride; Prime Minister Modi and Mamata's reaction

युनोस्कोने बुधवारी बंगालच्या दुर्गापूजेला सांस्कृतिक वारशाचा दर्जा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनोस्कोच्याच्या या घोषणेबाबत आनंद व्यक्त केला आहे. सर्व देशवासियांसाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचेही मोदींनी म्हटले आहे. दुर्गा पूजा ही नेहमीच्या पूजेपेक्षा मोठी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे(Yenosco gives cultural heritage status to Durga Puja in Bengal! This moment of pride; Prime Minister Modi and Mamata's reaction).

    न्यूयॉर्क : युनोस्कोने बुधवारी बंगालच्या दुर्गापूजेला सांस्कृतिक वारशाचा दर्जा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनोस्कोच्याच्या या घोषणेबाबत आनंद व्यक्त केला आहे. सर्व देशवासियांसाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचेही मोदींनी म्हटले आहे. दुर्गा पूजा ही नेहमीच्या पूजेपेक्षा मोठी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे(Yenosco gives cultural heritage status to Durga Puja in Bengal! This moment of pride; Prime Minister Modi and Mamata’s reaction).

    तर भारत आणि भारतीयांचे अभिनंदन करत असल्याचे युनोस्कोने म्हटले आहे. दुर्गूजेचा समावेश हा सांस्कृतिक वारशात केलेयाने स्थानिकांना आनंद होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. सांस्कृतिक वारशात केवळ वस्तू आणि चिन्हांचा समावेश नसून, यात परंपरा आणि पूर्वजांच्या भावनांचाही समावेश असल्याचे युनोस्कोने म्हटले आहे. हा सगळा वारसा नव्या पिढ्यांकडे जात असतो, असेही त्यांनी म्हटले आहे.

    दुर्गापूजेच्या काळात धर्म आणि जाती विभाजनाची भावना संपुष्टात येत असल्याचेही युनोस्कोने नमूद केले आहे. दुर्गा पूजेला धार्मिक कार्यक्रमासह, कला क्षेत्रातही महत्त्व आहे. यानिमित्ताने होणाऱअया सार्वजनिक कार्यक्रमात नेक कलाकार, तंत्रज्ञ आणि डिझायनर्सनाही संधी मिळत असते.

    युनोस्कोच्या सांस्कृतिक वारशात, २०१६ साली या यादीत नवरोज आणि योग यांचाही समावेश करण्याच आला आहे. यासह २००८ साली रामलीला तर २०१७ साली कुंभमेळ्यालाही या यादीत स्थान मिळालेले आहे.