
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्या प्रकृती ढासळल्याच्या वृत्तांना पेव फुटलेलं आहे. अशा स्थितीत रशियात एका नव्या नेत्याचं नाव चर्चेत येऊ लागलं आहे. हा पुतिन यांची जागा घेईल, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरु झाली आहे. या व्यक्तीचे नाव आहे (yevgeny prigozhin) येवगेनी प्रिगोजिन.
मॉस्को: रशिया-युक्रेन युद्धानंतर (Russia And Ukraine War) रशियातील राजकीय स्थिती पालटण्याची शक्यता आहे. युद्धाला ३१६ दिवस पूर्ण झाले आहेत. रशियन सैन्याला युक्रेनमध्ये अनेक ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला आहे. यातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्या प्रकृती ढासळल्याच्या वृत्तांना पेव फुटलेलं आहे. अशा स्थितीत रशियात एका नव्या नेत्याचं नाव चर्चेत येऊ लागलं आहे. हा पुतिन यांची जागा घेईल, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरु झाली आहे. या व्यक्तीचे नाव आहे येवगेनी प्रिगोजिन. (Yevgeny Prigozhin) येवगेनी प्रिगोजिन हे पुतिन यांचे स्वयंपाकी आहेत.
पुतिन यांचा उत्तराधिकारी होण्याची चार कारणं
1. ६१ वर्षांचा येवगेनी प्रिगोजिन हे कट्टरपंथियांमध्ये लोकप्रिय आहेत. या कट्टरपंथियांच्या मते पुतिन यांच्या वाढत्या वयामुळं युक्रेन युद्धात रशियाचा पराभव झाला. तर येवगेनी प्रिगोजिन यांना पुतिनपेक्षा जास्त धोकादायक मानण्यात येतंय.
2. पुतिन यांचे नीकटवर्तीय असलेले येवगेनी प्रिगोजिन हे रशियात सर्वात पॉवरफुल मानण्यात येतायेत. युक्रेनमध्ये झालेल्या पराभवाला रशियन संरक्षण मंत्रालय आणि संरक्षण मंत्री सर्गेई हे जबाबदार असल्याची जाहीर टीका येवगेनी प्रिगोजिन करतायेत. पुतिन याचा विरोध करत नाहीयेत.
3. पुतिन यांच्या प्रकृतीबाबत अनेक अफवा पसरलेल्या आहेत. पार्किन्ससपासून ते कॅन्सरपर्यंत चर्चा सुरु आहे. जर पुतिन यांचे काही बरेवाईट घडले तर येवगेनी प्रिगोजिन हे रशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या स्पर्धेत पहिले नाव असणार आहे.
4. येवगेनी प्रिगोजिन हे त्यांच्या वॅगनर ग्रुपमधील भाडोत्री सैनिकांना सर्वाधिक उपयोगी फायटिंग फोर्सच्या रुपात समोर आणतायेत. एकाअर्थी ते रशियाच्या सैन्यासमोर आव्हान निर्माण करतायेत.
हॉट डॉग स्टॉलपासून पुतिनचे शेफ
येवगेनी प्रिगोजिन यांचा जन्म १ जून १९६१ साली सेंट पीटर्सबर्गमध्ये झाला. पुतिन यांच्याप्रमाणेच पीटसबर्गमध्येच त्यांचे पालन पोषण झाले. १९८१ साली मारहाण, दरोडे प्रकरणात त्यांना दोषी ठरवून १३ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. सोवियत सुनियनच्या पडावानंतर ९ वर्षांनी येवगेनी यांची जेलमधून सुटका झाली. जेलमधून बाहेर आल्यानंतर त्यांनी व्यवसाय करण्याचं ठरवलं. सर्वात आधी हॉट डॉगचा स्टॉल त्यांनी सुरु केला. त्यानंतर श्रीमंत लोकांसाठी त्यांनी एक रेस्टॉरंटही उघडलं.
येवगेनी प्रिगोजिन यांनी आपल्या काही पार्टनरसह एका बोटवर रेस्टॉरंट सुरु केलं. या रेस्टॉरंटला मोठी प्रसिद्धी मिळाली आणि सेंट पिटर्सबर्गमध्ये लवकरच हे रेस्टॉरंट फॅशनेबल डायनिंग स्पॉट म्हणून लोकप्रिय झालं. जागतिक नेत्यांना घेऊन पुतिन या ठिकाणी आले होते, यावरुन या हॉटेलच्या लोकप्रियतेची कल्पना येऊ शकेल. २००१ साली फ्रान्सचे राष्ट्रपती जैक शिराक, २००२ साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश आणि २००३ साली पुतिन यांनी त्यांचा वाढदिवसही याच ठिकाणी साजरा केला.
पुतिन यांच्या संपर्कात आल्यानंतर येवगेनी प्रिगोजिन यांनी कॉनकॉर्ड कॅटरिंगची सुरुवात केली. त्यानंतर रशियन सैन्य आणि शाळांना अन्न देण्यासाठी मोठमोठे सरकारी कॉन्ट्रॅक्ट त्यांना मिळाले. त्यांना राष्ट्रपतींचा स्वयंपाक करण्याचाही मान मिळाला. त्यानंतर येवगेनी प्रिगोजिन यांची ओळख पुतिन यांचा शेफ अशी झाली. गेल्या पाच वर्षांत येवगेनी प्रिगोजिन यांना ३.१ अब्ज डॉलर्स म्हणजेच २६ हजार कोटींचे सरकारी कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहेत.