झाकीर नाईकला हवी संस्कारी सून, अटी पाहून पोरी म्हणतात ‘फिर तो आपका बेटा जिंदगी भर कुंवारा रहेगा’

झाकीर नाईक यांच्या या पोस्टची नेटकरी खिल्ली उडवत आहेत. नेटकऱ्यांनी कमेंटमध्ये म्हटलंय की, या अटीबघून तुमचा मुलगा आयुष्यभर अविवाहीत राहिल पण त्याचं लग्न होणार नाही.

    मुस्लिम धर्मगुरु नेते झाकीर नाईक भारतीय माध्यमांमध्ये कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असतात. त्याला कारणही तसंच असतं. झाकीर नाईक भारतीय माध्यमांत सध्या चर्चेत आहेत ते त्यांच्या फेसबूक पोस्टमुळे.

    झालंय असं की, झाकीर नाईक यांना त्यांचा मुलगा फरिक याचं लग्न करायचंय आणि त्यासाठी ते मुस्लिम धार्मिक मुलीच्या शोधात आहेत. यासाठी झाकीर नाईक यांनी फेसबूकवर लग्नाच्या अटी, अपेक्षा पोस्ट केल्या आहेत.

    झाकीर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, “मी माझ्या मुलासाठी पत्नी शोधत आहे. फारिकसाठी एक चांगली मुस्लिम मुलगी पाहिजे. त्यामुलीने इस्लामचे पालन करणे अनिवार्य आहे. ज्या गोष्टींना इस्लाममध्ये ‘हराम’ मानलं गेलंय त्या सर्व गोष्टींपासून दूर राहिलं पाहिजे. मुलीचे चारित्र्य चांगले असावे आणि ती धार्मिक असावी. तीने इस्लामचा प्रसार करावा. विलासी जीवन टाळावे. इंग्रजी बोलता यावं. मलेशियात राहण्याची तयारी असावी. कोणत्यान कोणत्या इस्लामिक संघटनेशी संबंधीत असणे आवश्यक आहे.

    झाकीर नाईक यांच्या या पोस्टची नेटकरी खिल्ली उडवत आहेत. नेटकऱ्यांनी कमेंटमध्ये म्हटलंय की, या अटीबघून तुमचा मुलगा आयुष्यभर अविवाहीत राहिल पण त्याचं लग्न होणार नाही.