चीनमध्ये नव्या व्हायरसची दहशत, ३५ जणांना लागण

कोरोना व्हायरसमुळे जगातील अनेक देशांचे नुकसान झाले आहे. त्यातून सगळे सावरत असताना आता झुनोटिक लंग्या (Zoonotic Langya) या भलत्याच व्हायरसने डोके वर काढलं आहे. त्यामुळे चीनच्या आरोग्य प्रशासनासमोर नवे संकट उभे राहिले आहे.

    चीनमध्ये (China) पुन्हा एकदा एक जीवघेणा व्हायरस ( New Virus Found In China) आढळून आला आहे. झुनोटिक लंग्या (Zoonotic Langya) असे त्या व्हायरसचे नाव आहे. चीनमध्ये आत्तापर्यंत ३५ जणांना या व्हायरसची लागण झाली आहे. कोरोना व्हायरसमुळे जगातील अनेक देशांचे नुकसान झाले आहे. त्यातून सगळे सावरत असताना आता झुनोटिक लंग्या (Zoonotic Langya) या भलत्याच व्हायरसने डोके वर काढलं आहे. त्यामुळे चीनच्या आरोग्य प्रशासनासमोर नवे संकट उभे राहिले आहे.

    आत्तायपर्यंत पाच टक्के कुत्री आणि दोन टक्के शेळ्यांना या विषाणूची लागण झाली आहे. त्यामुळे पाळीव प्राणी असणाऱ्या व्यक्तींनी सतर्क राहण्याची गरज आहे. या विषाणूची लागण झालेल्या ३५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील इतर लोकांनाही या व्हायरसची लागण झाली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा विषाणू एका माणसातून दुसऱ्या माणसात पसरण्याची शक्यता कमी असल्याची माहिती मिळाली आहे.

    लंग्या विषाणूची लक्षणे –  रुग्णांना ताप, थकवा, खोकला, भूक न लागणे, स्नायू दुखणे, मळमळणे, डोके दुखणे उलट्या असे त्रास जाणवतात. तसेच त्यांच्या शरीरातील पांढऱ्या पेशींचे प्रमाणही कमी झाले आहे. हा आजार बळावला तर रुग्णाचे यकृत आणि किडनी निकामी होण्याचा धोका आहे.