२४ तासात २९६ जणांची कोरोनावर मात

  • तिघांचा मृत्यू ; ९५ नव्याने पॉझिटिव्ह

यवतमाळ (Yavatmal):  शहरातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर तसेच कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेले २९६ जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात गत २४ तासात तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून ९५ जण नव्याने पॉझिटिव्ह  आले आहेत.

मृत झालेल्या तीन जणांमध्ये यवतमाळ शहरातील ५८ वर्षीय व घाटंजी शहरातील ५५ वर्षीय पुरुष आणि आर्णि तालुक्यातील ५५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या ९५ जणांमध्ये ६९ पुरुष व २६ महिला आहेत. यात यवतमाळ शहरातील ३० पुरुष व १६ महिला, यवतमाळ तालुक्यातील दोन पुरुष व एक महिला, आर्णी तालुक्यातील एक पुरुष, बाभुळगाव तालुक्यातील एक पुरुष, दारव्हा शहरातील एक पुरुष व दोन महिला, दारव्हा तालुक्यातील एक पुरुष, दिग्रस शहरातील तीन पुरुष व एक महिला, कळंब शहरातील पाच पुरुष व एक महिला, महागाव शहरातील चार पुरुष, महागाव तालुक्यातील सात पुरुष व एक महिला, पांढरकवडा शहरातील एक पुरुष, पुसद शहरातील एक पुरुष व एक महिला, राळेगाव शहरातील एक पुरुष, उमरखेड तालुक्यातील एक महिला, वणी शहरातील आठ पुरुष व एक महिला, वणी तालुक्यातील दोन पुरुष व एक महिला, झरीजामणी शहरातील एक पुरुषाचा समावेश आहे.

वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार सद्यस्थितीत जिल्ह्यात ५५९ ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये ५४३ जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८१९० झाली आहे. यापैकी ६८३८ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण मृत्युंची संख्या २५० झाली आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात २७५ जण भरती आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत ७२७६६ नमुने पाठविले असून यापैकी ७१७०२ प्राप्त तर १०६४ अप्राप्त आहेत. तसेच ६३५१२ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.