ठार झालेली बैलजोडी
ठार झालेली बैलजोडी

यवतमाळ (Yavatmal):  तालुक्यातील भांब राजा येथे रविवारी चार वाजताचे दरम्यान वीज पडून बैलजोडी ठार झाली. प्रविण बाबाराव ऊईके यांच्या मालकीची ती बैलजोडी होती.शेत शेजारी संतोष डाळ यांचे शेतात बैल चरत असतांना ही दुदैर्वी घटना घडली. त्यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

हाता तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावून नेला आहे. शासनाने तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी पीडित शेतकरी प्रविण बाबाराव ऊईके यांनी केली आहे. अस्मानी आणि सुलतानी संकटाच्या चक्रव्युहात शेतकरी अडकला आहे.