यवतमाळः ईजारा येथे सुनील जाधव नामक तरुणाचा मशीनमध्ये अडकल्याने मृत्यू झाला.
यवतमाळः ईजारा येथे सुनील जाधव नामक तरुणाचा मशीनमध्ये अडकल्याने मृत्यू झाला.

यवतमाळ (Yavatmal) :  नेरपरसोपंत शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वाई ईजारा येथे आज रविवारी दुपारी १ वाजताच्या दरम्यान सुनील जाधव नामक तरुण हेडंबा मशीनमध्ये अडकून मृत्यू पावल्याची दुर्दैवी घटना परिसरात घडल्याने गावामध्ये शोककळा पसरली आहे.

यवतमाळ (Yavatmal):  नेरपरसोपंत शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वाई ईजारा येथे आज रविवारी दुपारी १ वाजताच्या दरम्यान सुनील जाधव नामक तरुण हेडंबा मशीनमध्ये अडकून मृत्यू पावल्याची दुर्दैवी घटना परिसरात घडल्याने गावामध्ये शोककळा पसरली आहे. नेर येथील कुरेशी नामक शेतकऱ्यांच्या शेतातील या परिसरामध्ये असणाऱ्या राठोड नामक मालकाची मशीन घेऊन सुनील हा शेतामध्ये सोयाबीनची कापणी करण्याकरता गेला होता.

पावसाच्या अनियमितपणामुळे लवकर सोयाबीन घरी यावे याकरिता शेतकरी पिकाची कापणी तातडीने करीत आहेत. शेतात काम करत असताना सुनीलचा हेडंबा मशीनमध्ये तोल जाऊन त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. सदर मृत्यूची बातमी परिसरामध्ये पसरतात शोककळा पसरली आहे. नेर पोलीस स्टेशनला याबाबतचे घटनेची माहिती मिळाल्यानंतर नेर पोलिस स्टेशनचे ठाणेदार व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वृत्त लिहीपर्यंत कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नव्हता; परंतु या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरातील शेतकरी वर्गात शोककळा पसरली आहे. अधिक तपास नेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार करीत आहे.

कुटुंबीयांना तातडीने मदत द्या
सुनील जाधवचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी असून होतकरू आणि गरीब असणाऱ्या सुनील जाधव च्या परिवाराला तातडीने शासनाने मदत करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी शासनाकडे केली आहे.