प्रेयसीने बायकोला हाकलून देण्याचा लावला तगदा, प्रियकराने उचलले टोकाचे पाऊल

  • पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत महिलेचे प्रेमसंबंध होते. तीच्या प्रियकराचे लग्न झाल्यामुळे महिलेने प्रियकरास बायकोला सोडून माझ्याशी लग्न करण्याचा तगदा लावला होता. त्यामुळे प्रियकराने तीला जवळील शिवारात नेले आणि विहिरीत ढकलून दिले.

यवतमाळ – यवतमाळमधील लाडखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिवारातील विहिरीत महिलेचा मृतदेह असल्याचे पोलीसांना कळविण्यात आले. पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि युवतीचा मृतदेह विहिरीतून काढला. गावातील पोलीस पाटील यांच्या तक्रारीवरुन अपघाती निधनाची नोंद करण्यात आली. महिला अनोळखी असल्याने पोलीसांनी तपास चालू केला. पोलीसांच्या तपासानुसार असे उघडकीस आले की महिलेचा खुन केला गेला आहे. 

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत महिलेचे प्रेमसंबंध होते. तीच्या प्रियकराचे लग्न झाल्यामुळे महिलेने प्रियकरास बायकोला सोडून माझ्याशी लग्न करण्याचा तगदा लावला होता. त्यामुळे प्रियकराने तीला जवळील शिवारात नेले आणि विहिरीत ढकलून दिले. 

काय आहे प्रकरण जाणून घ्या..

मृत महिलेचे नाव काजल मोरे (१८) आसे आहे. तर आरोपीचे नाव गजानन सुदगुते(२२) आहे. दोघांचे प्रेमसंबंध होते. परंतु काजलच्या आईचा लग्नाला विरोध असल्यामुळे मुलाच्या घरच्यांनी त्याचे दुसऱ्या मुलीसोबत लग्न लावुन दिले. लग्नाच्या १ महिन्यानंतर ही बातमी काजलला समजताच तिने प्रियकराचे घर गाठले आणि बायकोला सोडून माझ्याशी लग्न कर असा तगदा लावला. संतप्त होऊन प्रियकराने तिला शिवारात नेले आणि विहिरीत ढकलुन दिले याची प्रियकराने खुन केल्याची कबुली दिली आहे. लग्नाच्या एक महिण्यातच प्रियकराच्या हातात बेड्या पडल्या आहेत.