अंध निराधार कुटुंब घरकुलाच्या प्रतिक्षेत; पाच वर्षांपासून घरकुलासाठी चेकच्या प्रतीक्षेत

सर्वांसाठी घर ही  संकल्पना  फक्त कागदावरच दिसत आहे  मात्र प्रत्येक्षात चित्र वेगळे  आहे  प्रशासन  किती निर्दयी आहे याचे मात्र  चित्र  यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तहसील अंतर्गत येणाऱ्या करंजी रोड  अंतर्गत पाच वर्षा पासूनचे  घरकुल लाभार्थी  अजूनही प्रतीक्षेत आहे  की,  कधी चेक जमा होईल व  घराचे स्वप्न पूर्ण होईल.  

करंजी (Karanji).  सर्वांसाठी घर ही  संकल्पना  फक्त कागदावरच दिसत आहे  मात्र प्रत्येक्षात चित्र वेगळे  आहे  प्रशासन  किती निर्दयी आहे याचे मात्र  चित्र  यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तहसील अंतर्गत येणाऱ्या करंजी रोड  अंतर्गत पाच वर्षा पासूनचे  घरकुल लाभार्थी  अजूनही प्रतीक्षेत आहे  की,  कधी चेक जमा होईल व  घराचे स्वप्न पूर्ण होईल.

करंजी रोड येथील अंध निराधार  कुटुंब शंकर  संभाजी शिरपुकर वय ८० राहणार अंध आहे. याशिवाय निराधार यांचे पाच  वर्षसपासून घरकुल यादीत नाव आहे. मात्र ओ.बी.सी. गटात येत असल्याने  अद्याप  त्यांचे घरकुल  चेक जमा नाही झाले. वास्तव्यात  करंजी  ग्रामपंचायत अंतर्गत  ड यादीतील पूर्ण घरकुल लाभ  झालीत  मात्र  ओ बी सी  गटाचे  सर्व घरकुल  लाभार्थी  अद्याप  प्रतीक्षेत आहे. यातच पाच वर्षांपासून हे  अंध निराधार कुटुंब  घरकुलाच्या  प्रतीक्षेत आहे.