जिल्ह्यात गस्त आणि शिस्त दोन्ही घटक कायम राहील; पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ यांचे प्रतिपादन

पोलीस म्हटल्यानंतर प्रचंड दहशतीचे वातावरण असते. त्यामुळे या अगोदर पोलीस अधीक्षक कार्यालयांमध्ये आलेल्या माणसाला न्याय मिळेल अशी अपेक्षा नव्हती परंतु या पोलीस अधीक्षकांनी प्रत्येक अभ्यास गटाची समस्या सोडवण्याचा यथोचित प्रयत्न केला आहे.

यवतमाळ (उदय नवाडे). जिल्ह्यामध्ये पदार्पण केल्यानंतर जिल्ह्याची शांतता आणि सुरक्षा या दोन्ही महत्त्वाच्या मुद्द्यांवरती आम्ही काम करीत आहोत. विशेषत: म्हणजे जिल्ह्यामध्ये सुरू असणारे सर्व अवैध धंदे बंद असून त्याकरिता विविध यंत्रणा सज्ज करण्यात आलेल्या आहेत. विशेष करून कोम्बिंग ऑपरेशन सुद्धा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातला एक शांततामय आणि गुन्हेगारी मुक्त जिल्हा म्हणून महाराष्ट्रामध्ये परिचित व्हावा या अनुषंगाने आम्ही सदैव प्रयास आहोत.

यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवैध व्यवसाय फोफावले होते त्यामुळे त्या व्यवसायावर नियंत्रण ठेवण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे. सोळाही तालुक्यांमध्ये असणा-या अवैध धंद्यावरती सध्या वचक निर्माण झाला असून पोलीस प्रशासन सज्ज आहेत. अवैध प्रवासी वाहतुकीच्या संदर्भामध्ये सुद्धा पोलिसांची कार्यवाही तातडीने सुरू असून जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून घेतलेले निर्णय हे सर्वात महत्त्वपूर्ण आहेत.

बुलढाण्याचे पोलीस अधीक्षक म्हणून त्यांची कारकीर्द अत्यंत महत्त्वाची राहिली असून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये जनजागृती केली आहे. त्यामुळे यवतमाळ हे सांस्कृतिक शहर असून येथेही मला बरंच काही करण्याची संधी आहे. जनहितासाठी पोलिस प्रशासनाची वर्दी सदैव कायम राहील आणि त्यावर तिचा सन्मान सुद्धा राखले जाईल. असे प्रतिपादन पत्रकार परिषदेमध्ये पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांनी केले.

जनतेमध्ये समाधानाची लाट
या अगोदर यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवैध व्यवसायिक पावले होते, अवैध प्रवासी वाहतूक खुलेआम सुरू होती. विशेष करून गुन्हेगारी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढली होती. त्यामुळे शहरात यांनी जिल्ह्यामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असताना भुजबळ यांनी कार्यभार सांभाळल्यानंतर जनतेमध्ये समाधान व्यक्त केल्या जात आहेत विशेष करून प्रत्येक नागरिक समाधानाने आपल्या हक्काचा माणूस म्हणून त्यांच्याकडे बघत आहे. विशेष करून गुन्हेगारी जगतामध्ये सुद्धा प्रचंड चपराक निर्माण झाली असून आजही गुन्हेगारी अवैध वरलीमटका तसेच अवैध प्रवासी वाहतूक व जुगाराचे अड्डे हे हे बंद असून अड्डे चालवणारावर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वचक बसलेला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये या कार्याविषयी समाधान व्यक्त केल्या जात आहे.

अभ्यासगतांचे प्रत्यक्ष समाधान
पोलीस म्हटल्यानंतर प्रचंड दहशतीचे वातावरण असते. त्यामुळे या अगोदर पोलीस अधीक्षक कार्यालयांमध्ये आलेल्या माणसाला न्याय मिळेल अशी अपेक्षा नव्हती परंतु या पोलीस अधीक्षकांनी प्रत्येक अभ्यास गटाची समस्या सोडवण्याचा यथोचित प्रयत्न केला आहे. विशेष करून जिल्ह्यामध्ये कुठेही काहीही घडल्यात तातडीने माझ्याशी संपर्क करा. अशाप्रकारचे पहिल्यांदाच पोलीस अधीक्षक आल्याने सर्वसामान्य नागरिक, पोलीस प्रशासन प्रशासन व पत्रकारितेच्या संबंधित असणारे प्रतिनिधी सुद्धा थेट पोलिस अधीक्षकांशी संपर्क साधत असतात त्यामुळे तो एक जनसंपर्काचा भाग म्हणून पाहिले जात आहेत.