पाण्याच्या बाटलीने केला घात! खंडाळा घाटात कारचा विचित्र अपघात, चालकासह दोन जण जागीच ठार

खंडाळा घाट येथे झालेल्या कारच्या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जणांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. पुसद तालुक्यातील ग्रामीण पोलीस ठाण्यामधील मोतीराम बोडखे, ठाणेदार, यांनी सदर घटनेची पाहणी केली असता, गाडीमध्ये एक बिसलेरी पाण्याची बॉटल ठेवण्यात आली होती.

    यवतमाळ : पुसद तालुक्यातील खंडाळा घाट येथे तवेरा पलटी झाल्याने चालकासह दोन जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. तीन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांना पुसद येथील शासकीय रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सदर तवेरा कार ही एमपीमधील असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. वाहनात एक बिसलेरी बॉटल होती. ती क्लचमध्ये जाऊन अडकली. यात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. एका बॉटलने घात झाल्याची बाब पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यात उघड झाली.

    खंडाळा घाट येथे झालेल्या कारच्या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जणांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. पुसद तालुक्यातील ग्रामीण पोलीस ठाण्यामधील मोतीराम बोडखे, ठाणेदार, यांनी सदर घटनेची पाहणी केली असता, गाडीमध्ये एक बिसलेरी पाण्याची बॉटल ठेवण्यात आली होती. परंतु ही बॉटल क्लचमध्ये अडकल्यामुळे तवेरा कारचा भीषण अपघात झाला. तसेच गाडी चालवताना क्लच, एक्सलेटर आणि ब्रेकच्यामध्ये पाण्याची बॉटल ठेवू नये, अशा प्रकारची विनंती पोलिसांनी केली आहे.