सहस्रकुंड धबधब्याच्या पाण्यात वाहून गेलेली महिला ममता संतोष कुमार
सहस्रकुंड धबधब्याच्या पाण्यात वाहून गेलेली महिला ममता संतोष कुमार

  • महिलेच्या मुलीला वाचविण्यात यश

ढाणकी (Dhakni ) :  यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील विदर्भ-मराठवाडा सीमेवर असलेल्या पैनगंगा नदी पत्रावर सहस्रकुंड धबधबा पाहण्यासाठी आलेल्या यवतमाळ येथील दोन कुटुंबातील एक महिला पाण्यात वाहत गेली. मुरली येथिल बंधाऱ्याचा प्रवाह शनिवारी दुपारी अचानक वाढल्याने पाण्याचा प्रवाहात दोन कुटुंब वाहून जाऊ लागले. ग्रामस्थांनी हा प्रसंग पहिला आणि त्यांना विचविले. मात्र एक महिला पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना सहस्रकुंड धबधबा परिसरात घडली आहे.

यवतमाळ येथील पंजाब नॅशनल बँकेतील क्लर्क संतोष कुमार यांची पत्नी ममता संतोष कुमार (35) ही पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेल्याचे ग्रामस्थांनी सांगितले व कुमार या मुलीला संदीप किसन राठोड(30) रा. मुरली या युवकाने जीवावर उदार होऊन त्या मुलीला पाण्यातून बाहेर काढले. ही घटना आज दुपारी चार वाजता घडली आहे. सदर महिला अजून सापडली नसून चौकशी बिटरगाव पोलीस प्रशासन त्या महिलेचा शोध घेत आहे. त्या महिलेचा शोध तात्काळ लावण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.