मारेगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा.--- स्वराज्य शेतकरी युवा संघटनेचे चक्काजाम आंदोलन
मारेगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा.--- स्वराज्य शेतकरी युवा संघटनेचे चक्काजाम आंदोलन

दिलेल्या विविध मागण्याच्या निवेदनाची प्रशासन स्तरावर कुठलीच दखल न घेतल्याने अखेर स्वराज्य शेतकरी युवा संघटनेच्यावतीने आज स्थानिक आंबेडकर चौकात महामार्गावर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी चक्का जाम करून मुंडन आंदोलन करण्यात आले.  मारेगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करा.व नगर पंचायत मधील समस्या तात्काळ सोडाव्यात आदी विविध मागण्या चे निवेदन स्वराज्य शेतकरी युवा संघटना च्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन किन्हेकार यांचे नेतृत्वात तहसिलदार मार्फत पालकमंत्र्यास 13 ओक्टॉम्बर ला देण्यात आले होते.निवेदनाची प्रशासनाने कुठलीच दखल न घेतल्याने 22 ओक्टॉम्बर रोजी मागण्या मंजुर न झाल्यास रस्त्यावर उतरुण मुंडन आंदोलनाचा ईशारा दिलेल्या स्मरणपत्रातून संघटनेने दिला होता.

मारेगाव (Maregaon):  दिलेल्या विविध मागण्याच्या निवेदनाची प्रशासन स्तरावर कुठलीच दखल न घेतल्याने अखेर स्वराज्य शेतकरी युवा संघटनेच्यावतीने आज स्थानिक आंबेडकर चौकात महामार्गावर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी चक्का जाम करून मुंडन आंदोलन करण्यात आले.  मारेगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करा.व नगर पंचायत मधील समस्या तात्काळ सोडाव्यात आदी विविध मागण्या चे निवेदन स्वराज्य शेतकरी युवा संघटना च्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन किन्हेकार यांचे नेतृत्वात तहसिलदार मार्फत पालकमंत्र्यास 13 ओक्टॉम्बर ला देण्यात आले होते.निवेदनाची प्रशासनाने कुठलीच दखल न घेतल्याने 22 ओक्टॉम्बर रोजी मागण्या मंजुर न झाल्यास रस्त्यावर उतरुण मुंडन आंदोलनाचा ईशारा दिलेल्या स्मरणपत्रातून संघटनेने दिला होता.

यामध्ये मारेगाव तालुका ओला दुष्काळ घोषित करा तसेच परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या कपासी,सोयाबीन पिकाचे सर्व करून तात्काळ शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार मदत करा. खुल्या जागेवर असलेल्या कचरा डेपो मूळे प्लास्टिक उडून परिसरातील शेतकऱ्याचा शेतात जाऊन नुकसान होत असल्याने त्वरित कंपाउंड करा.एमआयडीसी त्वरित चालू करून तालुक्यातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दया. शहर विकास निधीतून शहरात झालेल्या 3 कोटी रुपयांच्या कामाची चौकशी करा.निकृष्ट दर्जाचे झालेल्या कामाचा दर्जा तपासून दोषींवर कारवाई करा.प्रभाग क्र.12 मधील पाईप लाईन च्या कामाचे बिल कोणी दिले? जीवन प्राधिकरण याची इस्ट्रीमेट सहित माहिती द्यावी.घरकुल लाभार्थ्यांना तिसरा हप्ता त्वरित द्यावा.नगर पंचायतचा कोंडवाड्याचा करार संपुन 2 ते 3 महिन्या पासून जुनाच ठेकेदार कोंडवाडा चालवीत असल्याने कोंडवाड्याचे टेंडर काढण्यात यावे.शहरात क्रीडासंकुलन तयार करावे. आदी विविध मागण्या घेऊन स्वराज्य शेतकरी युवा संघटनेच्या वतीने तहसिलदार दीपक पुंडे यांचे मार्फ़त वनमंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड याना 13 ओक्टॉम्बर रोजी निवेदन देण्यात आले होते.

मात्र प्रशासनाणे कुठलीच दखल घेतली नसल्याने आज रस्त्यावर उतरून चक्का जाम करून मुंडन आंदोलन केले.तहसीलदार व मुख्याधिकारी येई परंत जवळपास 1 तास चक्का जाम करून टायर जाळण्यात आले.प्रशासनचे विरोधात तीव्र शब्दात घोषणाबाजी करण्यात आली.अखेर तहसीलदार व मुख्याधिकारी यांना दिलेल्या आश्वासन नुसार आंदोलन मागे घेण्यात आले. स्वराज्य शेतकरी युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन किन्हेकार यांच्या नेतूत्वात हे आंदोलन करण्यात आले.यावेळी सचिन पचारे,विशाल किन्हेकार,विजय मेश्राम, राजू मांदाडे,तुकाराम वासाडे,सोमेश्वर गेडेकर,अनिल राऊत,गोपाळ खामनकर, राजू खडसे,राजू गौरकार,नितीन कडू,अभय गवळी,अतुल देवगडे, शेषराव मडावी,सुरज गमे,प्रवीण काळे,विकास राऊत सह आदी शेकडो कार्यकर्ते आंदोलनात उपस्थित होते.