आत्महत्याग्रस्त कुटुंबीयास मदत करताना नाम फाऊंडेशनचे कार्यकर्ते
आत्महत्याग्रस्त कुटुंबीयास मदत करताना नाम फाऊंडेशनचे कार्यकर्ते

'नाम' फाऊंडेशन तर्फे मान्यवरांच्या हस्ते सोमवारी नागेशवाडी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी यांच्या कुटुंबाला पंधरा हजार रुपयांचा धनादेश देऊन मदत करण्यात आली. उमरखेड तालुक्यातील नागेशवाडी येथील रहिवासी व शेतकरी सुनिल दत्तराव सोळंके ह्या शेतकर्‍याची दीड एकर शेती दिवटपिंपरी येथे होती.खरीपाअंतर्गत सोयाबीन पीकाची एकदा दोनदा नव्हे तर तिनवेळा पेरणी केली. दरम्यान अतिवृष्टीमुळे पिक निघाले नाही.

श्रीरामपूर (Shrirampur). ‘नाम’ फाऊंडेशन तर्फे मान्यवरांच्या हस्ते सोमवारी नागेशवाडी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी यांच्या कुटुंबाला पंधरा हजार रुपयांचा धनादेश देऊन मदत करण्यात आली. उमरखेड तालुक्यातील नागेशवाडी येथील रहिवासी व शेतकरी सुनिल दत्तराव सोळंके ह्या शेतकर्‍याची दीड एकर शेती दिवटपिंपरी येथे होती.खरीपाअंतर्गत सोयाबीन पीकाची एकदा दोनदा नव्हे तर तिनवेळा पेरणी केली. दरम्यान अतिवृष्टीमुळे पिक निघाले नाही.

मागील वर्षीही नापिकीची परिस्थिती आल्याने तसेच पीक कर्ज एक लक्ष पन्नास हजार रुपये व थकीत साठ हजार ₹ यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होते. यामुळे त्यांनी सात जुलैला नागेशवाडी येथील राहत्या घरी गळफास लावून जीवनयात्रा संपवली. कुटुंबातील कर्ता गेल्याने कुटुंब उघड्यावर आले व वयोवृद्ध सासू, दोन लहान मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी विधवा पत्नीवर पडल्याने कुटूंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न त्यांच्या पुढे उभा ठाकला.

ह्या आपत्तीग्रस्त कुटुंबाची माहिती नाम फाऊंडेशनचे समन्वयक स्वप्निल देशमुख यांना मिळाल्यानंतर त्यांनी सदर प्रकरण वरिष्ठांकडे पाठवून नामचे विदर्भ व खानदेश समन्वयक हरीश इथापे यांनी प्रस्ताव मंजूर केला व मृतकाच्या पत्नीच्या नावे पंधरा हजारांचा धनादेश पाठवून दिला. आत्महत्त्याग्रस्त कुटुंब श्रीरामपूरलगत असलेल्या काकडदाती येथील आपल्या नातेवाईकांकडे आले असताना ‘नाम’च्या वतीने उपक्रमशिल शिक्षक शशिकांत जामगडे यांचे हस्ते व सामाजिक कार्यकर्ते किरण देशमुख सवणेकर, प्रफुल्ल जोशी, नामचे पुसद उपविभागीय समन्वयक स्वप्नील देशमुख, व्यंकटेश चिद्दरवार यांच्या उपस्थितीत स्वाती सोळंके यांना पंधरा हजार रुपयांचा धनादेश सुपुर्द करण्यात आला. यावेळी त्यांचे बंधू निर्गुण कदम व नातेवाईक आनंदा नरवाडे हे उपस्थित होते.