रसायनांचा वापर करून पिकविलेली फळे आरोग्यासाठी घातक

खापरखेडा: रोज तापमानात वाढ होत असल्याने फळांच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र लॉकडाऊनचा फटका अनेक शेतकऱ्यांना बसल्याने जिल्हयाबाहेरून येणाऱ्या फळांची आवक मंदावली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी

खापरखेडा: रोज तापमानात वाढ होत असल्याने फळांच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र लॉकडाऊनचा फटका अनेक शेतकऱ्यांना बसल्याने जिल्हयाबाहेरून येणाऱ्या फळांची आवक मंदावली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रसायनांचा वार करून पिकविलेली फळे आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे.

उन्हाळयाच्या दिवसात आंब्यासह थंड फळांना ग्राहकांकडून चांगली मागणी असते़ यावर्षी सातत्याने वातावरण बदलाच्या परिणामाने जिल्ह्यातील आंब्याच्या उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे फळांना केमिकलयुक्त पध्दतीने पिकवून फळ विक्रेते फळांची विक्री करीत आहेत़. अनैसर्गिक पध्दतीने फळांवर रसायनांचा वापर वाढत असल्याने अशा फळांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने ठिकठिकाणच्या फळविक्रेत्यांकडून तपासणी करण्याची गरज आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यात टरबुज फुटल्याची घटना घडली होती़. यावरून फळांमध्ये केमिकलचा तसेच विविध रसायने वापरून त्वरीत बाजारपेठेत विकण्याची स्पर्धाच सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. नागरिकांनी फळे विक्री करताना विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे.
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असताना महामार्गावरून परतणारे मजूर, वाहनधारक अनेकदा फळे खरेदी करताना दिसत आहेत. त्यामुळे या ठिकाणी फळ विक्रेत्यांनी फिजीकल डिस्टन्सिंगसह सॅनिटायझरचा वापर करण्याची गरज आहे. मात्र अनेक ठिकाणी फळविक्रेते याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे़ जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन नैसर्गिकरित्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या फळांना बाजारपेठ उपलब्ध करून् देण्याची गरज आहे. जिल्ह्यात मोठया प्रमाणात भाजीपाला व फळ पिकाखालील क्षेत्रात वाढत झाली आहे़ त्यामुळे कलींगड, खरबूज, आंबा, चिंकू यासारखी फळे जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांच्या फळांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा होईल.