प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

वातावरण बदलामुळे जिल्ह्यातील रबी पिके धोक्यात आली असून शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. सतत येणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होवून त्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

    यवतमाळ (Yavatmal).  वातावरण बदलामुळे जिल्ह्यातील रबी पिके धोक्यात आली असून शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. सतत येणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होवून त्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

    जिल्ह्यात आतापर्यंत उन्हाळी धान पिकांसह हरभरा, गहु, लखोळी, जवस, वटाना, पोपट, उडीद, मूग, मका, सूर्यफूल, करडई, भाजीपाला, बटाटा, वांगे, मिरची आदी पिकांची शेतकऱ्यांनी लागवड केलेली आहे. धानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये पावसाचा लहरीपणा व किडींच्या प्रभावामुळे उत्पादन घटले होते. खरीप हंगामात धानाचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांची भिस्त रबी पिकावर आहे. मात्र ढगाळ वातावरण, किडींचा प्रादुर्भाव आदी कारणामुळे पिके संकटात आहेत. सध्याचे वातावरण काहीसे ढगाळ व अधून मधून पावसाच्या सरी येत असल्याने अश्या वातावरणात रबी पिकांवर मोठ्या प्रमाणात करपा व कडाकरपा तसेच ईतर किडींचाही प्रादुर्भाव झाला आहे.

    उपाययोजना : 
    शेतकऱ्यांनी लष्करीअळी आढळताच नियंत्रण म्हणून डायक्लोरोव्हास 76 टक्के, ईसी 12.5 मी.ली. प्रती 10 ली. पाणी या प्रमाणात शेतात फवारावे, खोडकिडा, गादमाशी आढळल्यास नियंत्रण म्हणून क्विनोलफोस 25 टक्के, ईसी 26 मिली/10 ली पाणी किंवा कारटेप हायड्रोक्लोराइड 50 ईसी 20 ग्रम/10 ली. पाणी किंवा फीप्रोनील 0.3 जी 25 कि.ग्रम/हेक्टर किंवा क्लोरअन्त्रानिलीप्रोल 18.5 टक्के एसपी 3 मिली/10 ली.पाणी तसेच करपा/पर्णकोषकरपा यासाठी नियंत्रण म्हणून कार्बेन्डॅझिम 50 टक्के डब्लूपी 10 ग्रम 10 लीटर पाणी किंवा ट्रायसायक्लोझोल 75 टक्के एसपी 7 ग्रम 10 ली. पाणी किंवा प्रोपीकोनाझोल 25 टक्के ईसी 10 मिली 10 ली. पाणी किंवा हेक्झाकोनाझोल 5 टक्के ईसी 20 मिली/10 ली. पाणी किंवा व्हालीडामायसीन 3 टक्के एसएल 25 मिली/10 ली. पाणी व कडाकरपासाठी नियंत्रण म्हणून कॉपर आक्झीक्लोराईड 50 टक्के डब्लूपी 25 ग्रम/10 ली. पाणी किंवा स्टेपट्रोसायक्लीन 0.5 ग्रम/10 ली. पाणी मिसळून फवारावे अशाप्रकारे साध्या पंपासाठी असून पावरस्प्रे पंपकरिता प्रमाण दुप्पट करावेत.