यवतमाळ जिल्ह्यातील दराटी गाव पाण्याखाली; नाल्याचे पाणी शिरले गावात

    यवतमाळ (Yavatmal) : गेल्या तीन दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात (Yavatmal district) पावसाने (Heavy rains) जोरदार हजेरी लावली. सर्वच नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. पैनगंगा नदीने (The Panganga River) तर रुद्रावतार धारण करीत धोक्याची पातळी ओलांडली आहे.

    उमरखेड तालुक्यातील दराटी या गावातील नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्याने वेढा घातल्याने संपूर्ण गावात पाणी शिरले आहे. त्यामुळे गावात हाहा:कार माजला आहे. पाणी नागरिकांच्या घरात आल्याने साहित्याची नासधूस झाली आहे. गावकऱ्यांकडून प्रशासनाला मदतीची याचना करण्यात आली आहे.