प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो

वणी (Wani) :  रेल्वेखाली चिरडल्याने एका 45 वर्षीय इसमाचे दोन्ही पाय कापल्या गेले. त्यामध्ये त्याला प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने उपचाराकरीता नेत असताना वाटेत मृत्यू झाला. ही गंभीर घटना 11 ऑक्टोबरला सांयकाळी 6.30 वाजताच्या सुमारास यवतमाळ जिल्ह्यातील वाणी येथील चिखली रेल्वे क्रॉसिंग येथे घडली.

विजय अग्रवाल (45) रा. अकोला. असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते लालपुलिया येथील एफसीआय कोल फिल्ड कंपनीत काम करीत असल्याची माहिती आहे. तसेच आपल्या लहान भावाकडे चिलखगाव येथे राहत होते. रविवारी ११ ऑक्टोबरला सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास चिखलगाव येथील रेल्वेपुढे आल्याने हा अपघात झाला. यामध्ये विजय यांचे दोन्ही पाय कापल्या गेले. गावक-यांनी समयसुचकता दाखवीत रुग्णवाहिका बोलाविली; परंतु रुग्णालयात नेत असतांना वाटेत त्यांचा मृत्यू झाला.

विजय अग्रवाल यांच्यावर 15 दिवसांपूर्वी वणीच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होता. शुक्रवार 9 तारखेला त्यांना रुग्णालयातून सुट्टी मिळाली होती. तेव्हापासून ते मानसिक तणावात असल्याची माहिती आहे. या तणावामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे गावक-यांचे म्हणणे आहे. त्यांच्या आकस्मिक मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे.