मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला पाच लाख रुपयांची मदत मिळावी यासाठी निवेदन देताना गुरुदेव सेवा संघाचे पदाधिकारी
मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला पाच लाख रुपयांची मदत मिळावी यासाठी निवेदन देताना गुरुदेव सेवा संघाचे पदाधिकारी

विद्युत वाहिनीच्या तारेचा स्पर्श झाडाला असल्याने एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला त्यामुळे शेतकऱ्याची पत्नी व चार मुली उघड्यावर आल्या आहेत, केवळ वीज वितरण कार्यालय लाडखेडच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याचा जीव गेल्याचा आरोप गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी केला आहे.

यवतमाळ (Yavatmal). विद्युत वाहिनीच्या तारेचा स्पर्श झाडाला असल्याने एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला त्यामुळे शेतकऱ्याची पत्नी व चार मुली उघड्यावर आल्या आहेत, केवळ वीज वितरण कार्यालय लाडखेडच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याचा जीव गेल्याचा आरोप गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी केला आहे.

कुटुंबाला पाच लाख रुपयांची मदत मिळावी यासाठी संपूर्ण कुटुंबासह सर्व परिवार गुरुदेव सेवा संघाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये धडकला लहान लहान चिमुकल्या चार चार मुली घेऊन माझ्या बाबांच्या मृत्यूनंतर आमचा वाली कोणीच नाही अशी प्रतिक्रिया सुद्धा कुटूंबाने दिली जिल्हाधिकारी व निवासी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सोपविण्यात आले निवेदन दिल्यानंतर तातडीने वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची संवाद साधत लगेच मदत दिली जाईल अशा प्रकारचे आश्वासनही जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आले. याबाबत गुरुदेव युवा संघाच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी यांना संबंधितांवर योग्य कारवाई करण्याची मागणी करण्यात आली दारव्हा तालुक्यातील आमसेतचे येथे मृतक शेतकर्‍याच्या घरी जाऊन मनोज गेडाम यांनी परीजणांचे सात्वन केले, यावेळी परिवाराला योग्य न्याय मिळवून देऊ असे आश्वासित केले,

आमशेत येथील शेतकरी रामेश्वर जाधव हे शेळ्यांसाठी चारा आणण्याकरिता गेले होते हे शेळ्यांसाठी चारा तोडत असताना गावातील झाडावर वीज वाहिनीच्या लोंबकाळलेल्या तार असल्याने झाडाला जोरदार करंट असल्याने शेतकरी जाधव याचा जागीच मृत्यू झाला, कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने शेतकरी जाधव यांची पत्नी व चार मुली उघड्यावर आले आहेत,वीज वितरण कंपनी लाडखेडच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी केला आहे, याबाबत गुरुदेव संघाच्यावतीने आमसेत येथील मृतक शेतकरी जाधव यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या परीजणांचे सात्वन केले,

यावेळी मृतक शेतकऱ्याच्या पत्नीला व चार मुलीला योग्य न्याय गुरुदेव संघाच्यावतीने मिळवून देण्याचे आश्वासन मनोज गेडाम यांनी दिले, मनोज गेडाम यांनी वीज वितरण कार्यालयात संपर्क केला असता विद्युत निरीक्षक यांनी मृतक शेतकरी रामेश्वर जाधव यांच्या परिवाराला योग्य न्याय मिळणार असल्याचे सांगितले,मृतक शेतकऱ्याच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय सेवेत घ्यावे व तात्काळ आर्थिक मदत द्यावी ही मागणी गुरुदेव युवा संघाच्या वतीने या वेळी करण्यात आली, मागणी मान्य न झाल्यास वीज मंत्री नितीन राऊत यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचे गुरुदेव संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी यावेळी सांगितले.