दिनेश आणि मनीष कांबळे दोन छोट्या चिमुकल्यांसह(यवतमाळ)
दिनेश आणि मनीष कांबळे दोन छोट्या चिमुकल्यांसह(यवतमाळ)

यवतमाळ (Yavatmal):  केंद्र व राज्य शासनाच्या रमाई घरकुल योजने अंतर्गत गोधणी येथील दिनेश कांबळेचे घरकुल मंजूर झाले, परंतु हाच या पैशाने पायाभरणी केल्यानंतरही प्रशासनाने कुठल्याच प्रकारची मदत न केल्याने व सर्व कुटुंबच उघड्यावर वास्तव्य करीत आहे.

  • सामूहिक आत्महत्याबाबत प्रशासनास पत्र

यवतमाळ (Yavatmal):  केंद्र व राज्य शासनाच्या रमाई घरकुल योजने अंतर्गत गोधणी येथील दिनेश कांबळेचे घरकुल मंजूर झाले, परंतु हाच या पैशाने पायाभरणी केल्यानंतरही प्रशासनाने कुठल्याच प्रकारची मदत न केल्याने व सर्व कुटुंबच उघड्यावर वास्तव्य करीत आहे. याबाबत स्थानिक प्रशासनात सामूहिक आत्महत्या करण्याबाबतचे पत्र दिल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.

यवतमाळ पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गोधनी गावठाण येथील रहिवासी दिनेश कांबळेचे घरकुल एक वर्षापूर्वी मंजूर करण्यात आले. मंजुरीनंतर पैसे नसल्यामुळे गावातील सर्व घरकुल झाले, परंतु दिनेशचे घरकुल मात्र पैशाअभावी होऊ शकले नाही. नंतर त्याने पदरचा पैसा खर्च करून घरकुलची पायाभरणी करायला सुरुवात केली. संपूर्ण घर पाडल्यानंतर संसार उघड्यावर पडला आणि घरकुल बांधण्यासाठी आणलेला लोखंडी गज चोरट्यांनी अचानक पणे रात्री चोरून नेला. त्यामुळे घरकुल उभारणीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

सोबतच स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने पाण्याची कुठल्याच प्रकारची व्यवस्था केली नसल्याने घरकुलाला लागण्यासाठी पाण्याची नितांत आवश्यकता आहे. असे असताना मात्र ग्रामपंचायत प्रशासन कुठल्या प्रकारची सुविधा करून द्यायला तयार नाही. पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई गोधनी गावठाण येथे निर्माण झाली असून अनेकांना दुर्धर आजारांना सुद्धा समोरे जावे लागत आहे. त्यामुळे रमाई घरकुलच्या प्रतीक्षेत दिनेशचा संसार सध्या उघड्यावर असून स्थानिक प्रशासनाने लक्ष न दिल्यास मला हा निर्णय घ्यावा लागेल, असे दिनेश कांबळे यांनी शासनाला कळविले आहे.

कष्टातून विकत घेतलेल्या लोखंडाची चोरी
आम्ही कष्टातून घरकुल बांधायला लोखंड विकत घेतले होते; परंतु ते रात्री पूर्ण चोरीला गेले आहे. आता कसे घर उभारणार हा प्रश्न कायम आहे. दिनेश व त्याची पत्नी मनीषा कांबळे व लहान चिमुकल्यावर जीवन-मरणाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. तो तातडीने शासनाने सोडवावा. स्थानिक प्रशासन व रमाई घरकुलाची देखभाल करणारे कर्मचारी माझ्याकडे लक्ष देत नाही. राहायला घर नाही. जगायचे कसे हा प्रश्न उघड्यावर दिवस काढणे कुटुंबाला कठीण झाले आहे. त्यामुळे आम्हाला सामूहिक आत्महत्या आत्महत्येशिवाय पर्याय उरलेला नाही. प्रशासनाने लक्ष द्यावे हीच माझी विनंती आहे, अशी आर्त याचना दिनेश कांबळे यांनी केली आहे.