pandharkavda

पांढरकवडातुन नागपुर जाणा-या एसटी बसमधुन प्रवास करणा-या एका महिलेचे सोन्याचे मंगळसुत्र व काही हजार रूपये तीन चोरट्या संशयीत महिलांनी लंपास केल्याची घटना २४ नोव्हेंबरला घडली. या बसस्थानकावर सर्वच परिसरात अवैध प्रवासी वाहतुक करणारे वाहनचालक तसेच एजंट प्रवासी मिळविण्याच्या प्रयत्नात डेरा टाकुन असतात.

  • अवैध प्रवासी वाहतुकीला तोड नाही
  • करंजीच्या शेतक-याची आत्मदहनाची चेतावणी

पांढरकवडा. (विशाल मग्गीडवार) यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी रूजू होतांनाच सर्व प्रकारचे अवैध धंदे त्वरीत बंद करण्याची तंबी जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिका-यांना दिलेली होती. परंतु त्यांच्या या आदेशाचा पांढरकवड्याचे ठाणेदार स्वता:ला शिव छत्रपतींच्या अवीर भावात मजबुर असलेल्या सदर अधिका-याविरूध्द त्याच्या अवैध धंद्याच्या संरक्षणाबाबत कारवाई करण्याची हिंमत पोलीस अधिक्षक दाखविणार काय? असा सवाल या भागातील जनता करीत आहे. तर करंजी रोड येथील शेतकरी किशोर भेले यानी केलेल्या तक्रारीवर पांढरकवडा पोलीसांनी कुठलीही कारवाई गेल्या दिड वर्षापासून केली नसल्याने करंजी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन समोर आत्मदहन करण्याचा इशारा पोलीस अधिक्षकांना दिलेल्या निवेनातून केला आहे. अवैध प्रवासी वाहतुक या परिसरात प्रचंड वाढली आहे.

पांढरकवडा येथील पोलीस निरीक्षक स्वत:ला छत्रपती म्हणवून मिरवत असतात. पांढरकवडा तालुक्यात हजारो वाहने अवैध प्रवासी वाहतुकीत गुंतले आहे. बसस्टँडच्या आवारात या अवैध प्रवासी करणा-या गाड्या लागतात. करंजी, मारेगाव, वणी जाणा-यांना चक्क एसटी स्टँडच्या गेटवरूनच वाहनात कोंबून हि वाहने सुसाट निघतात. या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे एसटी महामंडळाचे प्रचंड नुकसान होत आहे. या अवैध वाहतुकीकडे पोलीसांचे मुळीच लक्ष नाही. याशिवाय शहरातील मध्यभागी येऊन हे लोक वाहने उभी करतात. तहसिल चौक, बिसा मुंडा चौक, राम मंदिर चौक, अशा भागात हि वाहने उभी असतात. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकची कोंडी होते. व नागरीकांना त्रास सहन करावा लागतो.

पांढरकवडातुन नागपुर जाणा-या एसटी बसमधुन प्रवास करणा-या एका महिलेचे सोन्याचे मंगळसुत्र व काही हजार रूपये तीन चोरट्या संशयीत महिलांनी लंपास केल्याची घटना २४ नोव्हेंबरला घडली. या बसस्थानकावर सर्वच परिसरात अवैध प्रवासी वाहतुक करणारे वाहनचालक तसेच एजंट प्रवासी मिळविण्याच्या प्रयत्नात डेरा टाकुन असतात. या बसस्थानकावरील पोलीस चौकी बंदच असते. या भागात पोलीसांचा कुठलाही बंदोबस्त नसल्याने दागिने व रोख रक्कम चोरीचे प्रकार घडतात.

दिड वर्षापुर्वी शेतातील केळी पिकाचे जाळुन नुकसान केलेल्या आरोपीविरूध्द पोलीसांनी अद्यापही गुन्हे दाखल न केल्याने हवालदिल झालेल्या शेतक-याने २६ नोव्हेंबर रोजी करंजी रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन समोर आत्मदहन करण्याचा इशारा मुख्यमंत्री व पोलीस अधिक्षक यांना पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे. किशोर विठ्ठल भेले असे या शेतक-याचे नाव आहे. सन २०१९ मध्ये त्याच्या आठ एकर शेतीपैकी तीन एकर शेतीमधील केळीची लागवड केली होती. पाच एकर शेतीत किसन वारलु पाटील हे करीत होते. भेले व पाटील यांच्यातील शेती वादाचे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. ८ मे रोजी दिनेश किसन पाटील यांनी शेतीच्या धु-याला आग लावल्याने भेले यांच्या केळी पिकांचे नुकसान झाले. या आधी भेले यांच्या केळी पिकासह ठिबक पाईप लाईन, किटकनाशक औषधी असे एकूण ३ लाखाच्या जवळपास साहित्य भस्म होऊन नुकसान झाले आहे. याबाबतची तक्रार पांढरकवडा पोलीसांकडे केली. परंतु चौकशीच्या नावावर प्रकरण थंड बस्त्यात ठेवण्यात आले. शिवाय तत्कालीन जमादाराने भेले यांना धमकी दिल्याचे तक्रारीत नमुद केले आहे. वारंवार ठाणेदारास भेठुन सुध्दा या प्रकरणात आरोपीविरूध्द गुन्हा दाखल केला नाही. गेल्या दिड वर्षापासून न्यायाच्या प्रतिक्षेत असलेले भेले यांनी अखेर याबाबत मुख्यमंत्री, मुख्यसचिव आणि पोलीस अधिक्षक यांना निवेदन पाठवुन कारवाईची मागणी केली आहे. आरोपीविरूध्द कारवाई न केल्यास २६ नोव्हेंबरला करंजी येथील डॉ आंबेडकर भवन समोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

अशाप्रकारे ठाणेदाराकडून वेगवेगळ्या तक्रारीच्या बाबत कारवाई करण्याास टाळाटाळ केली जाते. या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतुक व अवैध धंदे वाढलेले असुन त्यासंबंधात कारवाई करण्याची गरज आहे. सदर ठाणेदार स्वत:ला छत्रपती संबोधून त्यांच्या अविरभावात ते सतत राहतात. त्यामुळे त्यांच्या अरेरावीला अंकुश लावण्याचे काम वरिष्ठांनी करावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.