ईडीची मोठी कारवाई – शिवसेना खासदार भावना गवळींच्या ५ शिक्षण संस्थांवर छापा

ईडीने(ED Action In Yavatmal) शिवसेना खासदार भावना गवळींच्या(Bhavna Gawli) ५ शिक्षण संस्थांवर छापेमारी(ED Raid) केली आहे.

    यवतमाळ : ईडीने(ED Action In Yavatmal) शिवसेना खासदार भावना गवळींच्या(Bhavna Gawli) ५ शिक्षण संस्थांवर छापेमारी(ED Raid) केली आहे. ईडीने या कारवाईत कागदपत्रांची पडताळणी करण्यास सुरुवात केली आहे. भाजपा नेते किरीट सोमय्यांच्या वाशिम दौऱ्यातील आरोपानंतर ईडीचं पथक यवतमाळ जिल्ह्यात गेल्याची माहिती मिळाली आहे. गवळी यांच्या पाचही शिक्षण संस्थांच्या अधिकाऱ्यांनी ईडीकडून चौकशी सुरु आहे. वाशिमच्या देगाव, शिरपूर आणि इतर तीन ठिकाणी या पाच संस्था आहेत. गेल्या वर्षी ५ कोटी चोरीला गेल्याचे समोर आले होते त्यानंतर अनेक प्रकार समोर आले

    मिळालेल्या माहितीनुसार, २००६ चं प्रकरण बालाजी पार्टीकल बोर्ड सहकारी संस्था म्हणून उभं करण्यात आलं होतं. गवळींच्या निकटवर्तीयांनी हे खरेदी केल्याचा दावा करण्यात आला होता. याविषयी २०११ मध्ये मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली. यात मोठा गैरव्यवहार झाला असा आरोप करण्यात आला होता.