कोविड सेंटरमधून 20 रुग्णांचे पलायन; यवतमाळमध्ये खळबळ

घाटंजी तालुक्यात 24 एप्रिलला शनिवारी 45 बाधित रुग्णांची नोंद झाली. शुक्रवारी तालुक्यातील आमडी येथे कोरोना चाचणी शिबिर घेण्यात आले. या ठिकाणी तब्बल 17 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांना आयटीआय कॉलेजमधील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते.

    यवतमाळ : कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी शासन प्रशासन प्रयत्नशिल आहे. असे असताना बेजबाबदार नागरिक या प्रयत्नांवर पाणी फेरत आहेत. जिल्ह्यातील घाटंजी येथे असाच एक संतापजनक प्रकार घडला.

    येथील आयटीआय कॉलेजमधील कोविड केअर सेंटरमधून तब्बल 20 बाधितांनी पलायन केले होते. प्रशासनाच्या प्रयत्नानंतर या वीस जणांना पुन्हा कोविड सेंटरमध्ये परत आणण्यात यश आले आहे.

    घाटंजी तालुक्यात 24 एप्रिलला शनिवारी 45 बाधित रुग्णांची नोंद झाली. शुक्रवारी तालुक्यातील आमडी येथे कोरोना चाचणी शिबिर घेण्यात आले. या ठिकाणी तब्बल 17 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांना आयटीआय कॉलेजमधील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते.

    दरम्यान, शनिवारला या कोविड सेंटरमधून तब्बल 20 करोनाबाधित पळून गेल्याचे आरोग्य विभागाने शोध घेऊन 20 जणांना सेंटरमध्ये पुन्हा परत आणले.