खांमलवाडी गावातील भीमराव बळीराम पवार या अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या  घराला शुक्रवारी सकाळी पाच वाजता शॉर्टसर्किट होऊन आग लागली. या आगीमध्ये घरातील चालू खरीप हंगाम मधील २० क्विंटल कापूस जळून खाक झाला.

महागाव (Mahagaon) :  यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील शेवटच्या टोकावरील खांमलवाडी गावातील भीमराव बळीराम पवार या अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या घराला सकाळी पाच वाजता शॉर्टसर्किट होऊन आग लागली. या आगीमध्ये घरातील चालू खरीप हंगाम मधील २० क्विंटल कापूस जळून खाक झाला. यासह यामध्ये घरातील जीवनावश्यक वस्तू गहू-तांदूळ अन्नधान्य व इतर संसारोपयोगी सामान या आगीत भस्मसात झाले.

आग लागल्याची ओरडा ओरड होताच गावातील नागरिकांनी प्रसंगावधान राखून आग नियंत्रणात आणली.ऐन सणासुदीच्या तोंडावर शेतकऱ्यावर संकट ओढवल आहे. या घटनेची माहिती मिळताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मनीष जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर शेतकऱ्याला मानसिक आधार व बळ देण्यासाठी महागाव तहसीलदार यांना तात्काळ सदर घटनेची माहिती देऊन या शेतकऱ्यांना तातडीने शासन स्तरावरील आर्थिक मदत देण्याच्या संबंधाने सूचना केल्या. दरम्यान तहसीलदार नामदेव इसळकर यांनी सबंधित तलाठ्यास घटनास्थळी पाठवून झालेल्या नुकसानीचा प्राथमिक पंचनामा करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. या घटनेत शेतकऱ्याचे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यास शासनस्तरावरून मदत. मिळवून देण्याचे जाधव यांनी भेटी दरम्यान आश्वासन दिले.